आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts : Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol

B'DAY: काजोलपूर्वी करिश्माला डेट करत होता अजय, वाचा रंजक फॅक्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अजय-करिश्मा आणि अजय काजोल)
मुंबई- बॉलिवूडमध्ये गंभीर अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण आज (2 एप्रिल) 46वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयचे मूळ नाव विशाल देवगण आहे. त्याचा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी दिल्लीमध्ये झाला. अजयने मुंबईच्या मिठी भाई कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो दिग्दर्शक शेखर कपूरसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला.
अजय आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. अजय सध्या गोव्यामध्ये 'दृश्यम' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अजयच्या 11 वर्षीय मुलगी न्यासाला कुकिंगमध्ये रुची असून तिने अलीकडेच आई-वडिलांच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला केक तयार केला होता.
अजय देवगण सिनेमांमध्ये लाजाळू दिसत असला तरी तो ख-या आयुष्यात बिनधास्त आणि मस्तीखोर स्वभावाचा आहे.
करिश्मालाही केले आहे डेट-
अजय आणि काजोलच्या प्रेमाची सुरुवात 'गुंडराज' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यापूर्वी अजय करिश्मा कपूरला डेट करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अजय देवगणच्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टी...