आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत तब्बूसोबत या अॅक्टरने केली जबरदस्ती, बहिणीने केला होता खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉकी श्रॉफ आणि तब्बू - Divya Marathi
जॉकी श्रॉफ आणि तब्बू
मुंबई - तब्बूने 4 नोव्हेंबर रोजी 46वा वाढदिवस साजरा केला. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 मध्ये हैदराबादला झाला होता. हैदराबादमधील सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. त्यानंतर 1983 मध्ये तब्बू मुंबईत आली होती. तिने दोन वर्षे सेंट झेव्हियर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. नुकताच तब्बूचा वाढदिवस झाला यानिमित्ताने तिच्या आयुष्यासंबंधीचे एक मोठे सत्य, ते जर तेव्हाच तब्बुने जगासमोर आणले असते तर एका अॅक्टरचे करिअर कदाचित उद्धवस्त झाले असते. तो अॅक्टर म्हणजे जॉकी श्रॉफ.
 
तब्बूच्या बहिणीने केला होता खुलासा 
- 1986 मध्ये तब्बूची मोठी बहिण फराह नाज आणि जॉकी श्रॉफ 'दिलजला' फिल्मचे  शूटिंग करत होते. तेव्हा तब्बू नेहमी आपल्या बहिणीसोबत शूटिंगवर जात होती. या फिल्म मध्ये डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होता. 
- अशी माहिती आहे, की फिल्मची शूटिंग संपल्यानंतर डॅनीने घरी एक पार्टी ठेवली होती. त्यात फराह तिची छोटी बहिण तब्बूसोबत गेली होती. येथे फिल्मचा अॅक्टर जॅकीने एवढी दारू प्याली होती, की तो तब्बूसोबत जबरदस्ती करायला लागला. 
- फराहने एका मुलाखतीत हा खुलासा करताना सांगितले होते, की डॅनी जर तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचेच ठरवले होते. मात्र तब्बूने कधीही या घटनेचा उल्लेख केलेला नाही. कदाचित तीने जर तेव्हा याबद्दल कडक पाऊल उचलले असते तर जॉकीचे करिअर संपले असते. फराहच्या मते तब्बू तेव्हा 14 किंवा 15 वर्षांची असावी.
 
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या तब्बूच्या आयुष्यासंबंधी...  
बातम्या आणखी आहेत...