आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून पळून गेला होता आमिर खानचा भाऊ, परतल्यानंतर लावले होते गंभीर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खानला तुम्ही ओळखतच असाल. फैजलने बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले खरे, पण त्याला आमिरसारखे यश मिळू शकले नाही. अपयशामुळे खचलेला फैजल डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यातच त्याने एकेदिवशी घरातून पळ काढला होता. पण काही दिवसांनी घरी परतल्यानंतर त्याने भाऊ आमिर खानवर अनेक गंभीर आरोप लावले होते. आमिरने त्याला घरात डांबून ठेवल्याचे, फैजलने म्हटले होते. इतकेच नाही तर मानसिक रुग्ण असल्याचे सांगून आमिर त्याला बळजबरीने औषधे द्यायचा, असेही तो म्हणाला होता. 
 
1969 साली बाल कलाकाराच्या रुपात फैजलने सुरु केले होते करिअर...  
फैजल खानने 1969 साली रिलीज झालेल्या 'प्यार का मौसम' या सिनेमात शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 1988 साली आलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातसुद्धा तो झळकला होता. आमिर खानसोबत 'मेला' (2000) या सिनेमातही त्याने अभिनय केला होता. या सिनेमांसह फैजलने आणखी काही सिनेमे केले, पण तो फिल्म इंडस्ट्रीत यश मिळवू शकला नाही. हळूहळू फैजला सिनेमे मिळणे बंद झाले आणि फिल्म इंडस्ट्रीला त्याचा विसर पडला. 2007 साली फैजल घरातून पळून गेला आणि त्यामुळे तो अचानक प्रसिद्धीझोतात आला.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, फैजलविषयीच्या आणखी काही गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...