आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Actors And Actresses Who Were Drug Addict

शालेय जीवनात Drugs घेत होता रणबीर, हे स्टार्ससुध्दा होते Addict

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रणबीर कपूर 33 वर्षांचा झाला आहे. रणबीरच्या गर्लफ्रेंड्सपासून, सिनेमे आणि कुटुंबीयांपर्यंत सर्वांना माहित आहे. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की शालेय जीवनात रणबीर ड्रग अॅडिक्ट होता. मात्र तो चेन स्मोकर असल्याचे सर्वांना माहित आहे, मात्र याविषयीचा एक किस्सा माहित नसेल.
2011मध्ये एका मुलाखतीत रणबीरने याविषयी खुलासा केला होता, की 'रॉकस्टार'च्या शूटिंगवेळी त्याने ड्रगचे सेवन केले होते. त्याने सांगितले, की एका सीनसाठी भिती वाटत होती, म्हणून त्याने ड्रग सेवन केले आणि नंतर तो सीन शूट केला. यादरम्यान रणबीरने एक रहस्यसुध्दा सांगितले, शाळेत असताना तो ड्रग्स घेत होता. त्याची ही सवय बनली होती. परंतु आता रणबीर या व्यसनातून मुक्त झाला आहे.
ड्रग्स घेणा-या कलाकारांची बॉलिवूडमध्ये मोठी यादीच आहे. रणबीरशिवाय संजय दत्त, राहूल महाजन, फरगीन खान आणि अभिनेत्री मनीषा कोयरालासारखे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे ड्रग्सचे सेवन करताना रंगेहात पकडल्या गेले असतील. त्यांना पोलिसांनी अटकदेखील केली आहे. मात्र यातील बरेच स्टार्स आता या व्यसनातून मुक्त झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सना ड्रग्सचे व्यसन आहे आणि होते...