आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीसाठी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले होते बोनी कपूर, या 9 Wivesलासुद्धा मिळालाय धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेत्री श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी नुकतीच वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. बोनी कपूर यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1955 मध्ये मेरठमध्ये झाला. बोनी यांनी दोनदा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना शौरी होते, तर श्रीदेवी त्यांची दुसरी पत्नी आहे. अर्जुन कपूरची आई मोना शौरी कपूर यांनी जगाचा निरोप घेऊन 4 वर्षे उलटून गेली. 25 मार्च 2012ला त्यांचे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात कॅन्सरमुळे निधन झाले होते. फ्यूचर स्टुडिओच्या सीईओ राहिलेल्या मोना कपूर, निर्माता बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.

10 वर्षे मोठ्या बोनी कपूरसोबत झाले होते लग्न...
मोना कपूर 19 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न 10 वर्षे मोठ्या बोनी कपूर यांच्याशी झाले होते. हे अरेंज मॅरेज होते आणि दोघेही या लग्नाने आनंदी होते. अर्जुन कपूर आणि अंशुलाच्या जन्मानंतरही दोघांना संसार सुखाचा चालू होता. एकिकडे मोना यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली, दुसरीकडे बोनी यांनी निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये जम बसवला होता. परंतु आयुष्याच्या या सुखाच्या प्रवासात मोनी आणि बोनी यांच्यात श्रीदेवीने एंट्री केली. दोघांच्या सुखी संसारात दरी निर्माण झाली. मोनी यांना हा धक्का सहन झाला नाही. मोना यांची मुले शाळेत शिकत होती. त्यावेळी त्या पूर्णत: तणावात गेल्या होत्या. अखेर 1996मध्ये मोना यांनी बोनीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोनी यांनी 1996 मध्ये श्रीदेवीसोबत दुसरा संसार थाटला.
मोना कपूरसह बॉलिवूडमध्ये अशा अनेकजणी आहेत, ज्यांना त्यांच्या पतीकडून धोका मिळाला आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच अभिनेत्यांच्या पत्नीविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...