Home »Gossip» Famous South Actors And Their Pretty Wives

ही आहे अलु अर्जुनची पत्नी, भेटा फेमस साऊथ अॅक्टर्सच्या Wivesना

दिव्य मराठी वेब टीम | Aug 07, 2017, 15:14 PM IST

मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अलु अर्जुन लवकरच 'ना पेरू सूर्या' या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री अनु एमॅनुअल आणि अर्जुन सरजा हे दोन कलाकार अलु अर्जुनसोबत मेन लीडमध्ये असतील. 8 एप्रिल, 1983 रोजी चेन्नईत जन्मलेल्या अलुच्या करिअरची सुरुवात 2003 साली रिलीज झालेल्या 'गंगोत्री' या सिनेमातून झाली होती. अलुचा पहिलाच सिनेमा हिट झाला होता. तेलुगु सिनेमांमध्ये (टॉलीवुड) रोमँटिक इमेजसाठी त्याला ओळखले जाते. अलु अर्जुनचे 6 मार्च 2011 रोजी हैदराबादच्या स्नेहा रेड्डीसोबत लग्न
झाले.
पहिल्याच नजरेत स्नेहाच्या प्रेमात पडला होता अलु...
अलु आणि स्नेहा यांची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका लग्नात झाली होती. पहिल्याच नजरेत अलु स्नेहाच्या प्रेमात पडला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. अलु अयान हे त्यांच्या मुलाचे तर अलु अरहा हे मुलीचे नाव आहे.

फेसबुकवर 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स...
- फेसबुकवर 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स असणारा अलु अर्जुन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एकमेव अभिनेता आहे.
- 2016 साली अलु गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला टॉलिवूड स्टार ठरला होता. फोर्ब्स इंडियाच्या इंडियन सेलेब्रिटी लिस्ट (2016) मध्ये तो 42व्या स्थानावर आहे.
- अलु प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा आहे. आई निर्मला चिरंजीवीची बहीण आहे. या नात्याने अलु चिरंजीवी यांचा मुलगा तेजाचा भाऊ आहे.

पुढील 10 स्लाइड्सवर बघा, साऊथ अॅक्टर्स आणि त्यांच्या पत्नीचे PHOTOS...

Next Article

Recommended