आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Special : जेव्हा शाहरूखने पार्टीतच केली होती फराहच्या नवऱ्याला मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानने एका पार्टीत फराह खानचा पती शिरीष कुंदरला मारहाण केली होती. - Divya Marathi
शाहरुख खानने एका पार्टीत फराह खानचा पती शिरीष कुंदरला मारहाण केली होती.
मुंबई - फिल्ममेकर शिरीष कुंदर सध्या 44 वर्षांचा झाला आहे. 1973 ला मंगलोरमध्ये जन्मलेल्या शिरीषने फराह खानबरोबर लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. शिरीष त्याच्या पत्नीचा बेस्ट फ्रेंड शाहरुख खानबरोबरच्या वादामुळे चर्चेत आला होता. 2012 मध्ये जेव्हा संजय दत्तने 'अग्निपथ'ची सक्सेस पार्टी दिली होती, त्यावेळी त्यांचा वाद सर्वांसमोर आला होता. याच पार्टीत शाहरूखने शिरीष कुंदरला मारहाण केली होती. त्यानंतर शिरीषने शाहरुखच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते. पण तसे झाले नाही. 

हे होते मारहाणीचे कारण.. 
- शिरीषने त्यावेळी शाहरुखच्या 'रा.वन' चित्रपटाची खिल्ली उडवणारे ट्वीट केले होते. 'रा-वन च्या सुपर हिरोमध्ये जगातील सर्व प्रकारच्या शक्ती आहेत. लोकांचे मनोरंजन करण्याच्या शिवाय..' असे ट्वीट त्याने केले होते. हेच ट्वीट पार्टीत मारहाणीचे कारण बनले होते. 
- कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान अशा बातम्याही आल्या होत्या की, शिरीष पार्टीत तरुणींना छेडत होता त्यामुळे शाहरुखने त्याला मारहाण केली होती. पण दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारही दिली नाही, किंवा नंतर या विषयावर बोललेही नाही. 

चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती शिरीष-फराहची लव्ह स्टोरी 
- शिरीषने फराहबरोबर लव्ह मॅरेज केले आहे. विशेष म्हणजे शिरीष फराहपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. 
- शिरीष आणि फराहची पहिली भेट 'मै हू ना'(2004) च्या सेटवर झाली होती. त्याठिकाणीच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यानंतर 9 डिसेंबर 2004 मध्ये त्यांनी लग्न केले. 
- दोघांनी तीन मुले (तिळे) आन्या, दीवा आणि झार आहेत. त्यांचा जन्म 2008 मध्ये झाला होता. 
- फराह आणि शिरीषच्या लग्नात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, हृतिक रोशन, सुझैनसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 

शिरीष आणि फराहच्या लग्नाचे फोटो पाहा, पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...