आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिग्दर्शिका, कोरिओग्राफरपेक्षा वेगळी आहे ही रिअल लाइफ मॉम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिग्दर्शिका फराह खान)
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान कधी सिनेमांच्या दिग्दर्शनात तर कधी कोरिओग्राफीमध्ये बिझी असते. इतकेच नाही तर ती टीव्ही शोज होस्ट किंवा जजदेखील करताना दिसत असते. आपल्या एवढ्या बिझी शेड्युलमधून तिन्ही मुलांसाठी ती आवर्जुन वेळ काढत असते. आपल्या कामात कितीही बिझी असली तरीदेखील फराह तिची तिन्ही मुले आन्या, जार आणि दीवासोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसते.
समतोल साधणे जमते...
'मैं हुं ना', 'ओम शांति ओम', 'हॅपी न्यू इयर' या सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारी फराह आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये समतोल साधते. आपल्या बिझी शेड्युलमधूनदेखील ती आईच्या संपूर्ण जबाबदा-या सांभाळते. फराहचे पती आणि दिग्दर्शक शिरीष कुंदर नेहमी तिला यासाठी साथ देतात.
मुलांसोबत व्हेकेशन्स...
फराहने 11 फेब्रुवारी 2008 रोजी तिळ्या मुलांना जन्म दिला. फराह मुलांसोबत कॅम्प्समध्ये सहभागी होत असते. मुलांसोबत परदेशात सुटी घालवणे ती पसंत करते. त्यांच्यासोबत फिरणे, मजामस्ती करणे तिला आवडते. दिग्दर्शिका, जज, कोरिओग्राफर असलेल्या फराहची इमेज एका एरोगेंट महिलेच्या रुपात आहे. मात्र आम्ही तुम्हाला तिची अशी काही खास छायाचित्रे दाखवत आहोत, त्यामध्ये फराह एक उत्कृष्ट आई असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुलांसोबत मस्तीच्या मूडमध्ये फराह खान...