आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Aduna, Kiran Aamir Reena And Other Inter Religion Marriages Of Bollywood

फरहानने एकदा तर आमिरने दोनदा केले Inter-Religious Marriage

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 9 जानेवारी 1974 रोजी जन्मलेल्या अभिनेता फरहान अख्तरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. फरहान बी टाऊनमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने आंतरजातीय विवाह केला आहे. मुस्लिम धर्माला फॉलो करणा-या फरहानने 2000 मध्ये सिंधी असलेल्या अधुना भबानीसोबत विवाह केला. पहिल्याच भेटीत अधुनाच्या प्रेमात पडल्याची कबुली फरहानने एका मुलाखतीत दिली होती. गेल्या 15 वर्षांपासून दोघांचे सुखी वैवाहिक आयुष्य सुरु असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. फरहानसह बी टाऊनमध्ये आणखी काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी दुस-या धर्मात लग्न केले आहेत.
आमिर खानने दोनदा थाटले हिंदू तरुणींशी लग्न
आमिर खान (मुस्लिम) ने दोनदा लग्न केले. विशेष म्हणजे त्याची दोन्ही लग्ने ही दुस-या धर्मातच झाली. त्याचे पहिले लग्न रीना दत्ता (हिंदू) सोबत झाले होते. दोघांनी 18 एप्रिल 1986 रोजी पळून जाऊन लग्न केले होते. 16 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये आमिर आणि रीना यांनी घटस्फोट घेतला आणि डिसेंबर 2005 मध्ये आमिरने हिंदू धर्मीय असलेल्या किरण रावसोबत दुसरा संसार थाटला.
बॉलिवूडमध्ये अशाच आणखी काही इंटर-रिलीजन लग्नांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...