एन्टरटेन्मेंट डेस्कः 9 जानेवारी 1974 रोजी जन्मलेल्या अभिनेता फरहान अख्तरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. फरहान बी टाऊनमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने आंतरजातीय विवाह केला आहे. मुस्लिम धर्माला फॉलो करणा-या फरहानने 2000 मध्ये सिंधी असलेल्या अधुना भबानीसोबत विवाह केला. पहिल्याच भेटीत अधुनाच्या प्रेमात पडल्याची कबुली फरहानने एका मुलाखतीत दिली होती. मात्र आता फरहान आणि अधुना यांचा 15 वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. अधुना आणि फरहान यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असून दोघेही विभक्त झाले आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. विशेष म्हणजे अधुना फरहानपेक्षा वयाने मोठी आहे.
आता फरहान आणि अधुना यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली आहे. पण फरहानप्रमाणेच बी टाऊनमध्ये आणखी काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी दुस-या धर्मातील व्यक्तीची जोडीदाराच्या रुपात निवड केली. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींविषयी...
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा
हिंदू असलेल्या अभिनेता रितेश देशमुखने मँगलोरियन कॅथलिक कुटुंबातील जेनेलियासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांचे लग्न महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने झाले होते. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. या दाम्पत्याला आता दोन मुलं आहेत.
बॉलिवूडमध्ये अशाच आणखी काही इंटर-रिलीजन लग्नांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...