आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा, या 15 स्टार्सच्याही निधनाचे पसरले होते खोटे वृत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री फरिदा जलाल यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. रविवारी (19 फेब्रुवारी) फरिदा जलाल यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फरिदा जलाल यांनी ट्विट करुन त्या सुखरुप असल्याचे सांगितले. फरिदा म्हणाल्या, ''मी एकदम ठणठणीत आहे. मला काहीही झालेले नाही. काहीही तथ्य नसलेल्या अशा या अफवा कुठून पसरत आहेत हेच मला कळत नाहीये. मला माझे हसूच आवरत नाहीये. पण, गेला अर्धा तास माझा फोन सतत वाजतोय आणि लोक मला एकच प्रश्न विचारत आहेत, की तू कशी आहेस? हे त्रासदायक आहे. लोक अशा अफवा कसे पसरवू शकतात याचे मला आश्चर्य वाटते.''
 
लवकरच फरिदा जलाल या इमरान खानच्या आगामी ‘सरगोशिया’ सिनेमात काश्मिरी महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहेत. शिवाय त्यांची गाजलेली शरारत ही मालिकासुद्धा लवकरच छोट्या पडद्यावर सुरु होणार असल्याचीही चर्चा आहे. फरिदा यांचा जन्म 14 मार्च 1949 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. आजपर्यंत त्यांनी दोनशे पेक्षाही जास्त हिंदी सिनेमात काम केले आहे. तसेच, त्यांनी तेलगू, तमिल, इंग्रजी भाषिक सिनेमात आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. ‘शरारत’ या मालिकेत त्यांनी जियाच्या आजीची भूमिका साकारली होती.  
 
लता दीदींसह या सेलिब्रिटींच्याही मृत्यूची पसरली होती अफवा... 
तीन वर्षांपूर्वी गानकोकिळा लता मंगशेकर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर स्वतः लतादीदींनी या अफवांना पूर्णविराम दिला होता. मी अगदी ठणठणीत असल्याचे दीदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होती. मी माझ्या निधनाचे वृत्त ऐकून हैराण झाले, असेही लता दीदींनी म्हटले होते.

लता दीदींनी ट्विट केले होते, की नमस्कार मेरी तबियत के बारे में अफवाहें फैल रही हैं, पर आप सबका प्यार और दुआएं मेरे साथ हैं। मेरी तबियत बिल्कुल ठीक और और मैं स्वस्थ हूं।

काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची बातमी पसरली होती. कादर खान यांच्याप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही निधनाची बातमी सोशल नेटवर्किंग साईटवर पसरली होती. या बातमीमुळे बच्चन कुटुंबियांना मनःस्ताप सहन करावा लागला होता.
 
एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांच्या मृत्यूची अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर वा-यासारख्या पसरली होती. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती.
बातम्या आणखी आहेत...