आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... मराठमोळी सोनाली कुलकर्णी आहे बोल्ड, पाहा अॅक्ट्रेसेसचा हैराण करणारा ड्रेसिंग सेन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी-मराठीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज. - Divya Marathi
हिंदी-मराठीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज.
मुंबई- हिंदी, मराठीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सो कूल सोनालीने नुकतीच वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या यशस्वी करिअरमध्ये तिने अनेक उत्कृष्ट कलाकृतीत अभिनयाची वेगळी छाप सोडली. खासगी आयुष्यात सोनाली आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली. निर्माते-दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. या दाम्पत्याला आता एक मुलगी असून तिचे नाव कावेरी आहे.
ड्रेसिंग सेन्समुळे आली आहे चर्चेत
सोनाली आणखी एका कारणामुळे लाइमलाइटमध्ये असते आणि ते कारण म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स. खरं तर सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना सोनाली साड्यांना प्राधान्य देत असते. मात्र काही वेळा ती बोल्ड आउटफिटलाही पसंती दर्शवते. आता हेच बघा ना काही वर्षांपूर्वी 'सावरिया' या सिनेमाच्या प्रीमिअरला ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये हजेरी लावून सोनालीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनाली असेही आउटफिट परिधान करु शकते, हे त्यावेळी प्रथमच सर्वांना समजले होते. तिचा हा ड्रेस एवढा पारदर्शक होता, की त्यातून तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले होते. ग्लॅमरस दिसण्याच्या नादात सोनालीचे या ड्रेसमधून वार्डरोब मालफंक्शन झाले होते. तिने या ड्रेसची आयडिया कोठून घेतली, हे तर आम्हाला ठाऊक नाही, मात्र हा ड्रेस नक्कीच तिच्यावर शोभून दिसला नाही, असे म्हणता येईल.
बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींच्या फॅशनची उडाली आहे खिल्ली..
बॉलिवूडमध्ये सोनालीप्रमाणेच प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या ड्रेसमुळे चर्चा एकवटली आहे. मात्र त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल कौतुकास्पद नव्हे तर हास्यास्पद ठरली. त्यांनी परिधान केलेल्या विचित्र ड्रेसमुळे अनेकदा या अभिनेत्रींची खिल्लीसुद्धा उडाली आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज बघून फॅन्स हैराण झाले, तर परिणीती चोप्राचा बोल्ड लूक कॅमे-यात कैद झाला. करीनाने 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला परिधान केलेल्या ड्रेसमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 'गदर' फेम अमिषा पटेल असो वा 'स्टुडंट ऑफ द इयर'द्वारे अभिनय करिअरचा श्रीगणेशा करणा-या आलिया भटचा ग्लॅमरस लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
चला तर मग, पुढील स्लाईड्समध्ये बघुयात नावाजलेल्या अभिनेत्रींनी परिधान केलेले विचित्र ड्रेस...