आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father's Day: हे आहेत बॉलिवूडचे Stars वडील, मात्र मुले झालीत Flop

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजजगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. हा दिवस वडिलांचा सन्मान करण्यासाठी असतो, प्रत्येक मुलासाठी आपले वडील खास असतात. मग त्यात सामान्य व्यक्ती असो अथवा बॉलिवूड स्टार्स, सर्वांच्या मनात आपल्या वडिलांविषयी वेगळे स्थान असते. बॉलिवूड स्टार्स फादर आहेत ज्यांना आपल्या करिअरमध्ये खूप यश मिळाले, परंतु त्यांची मुलांच्या पदरी कधीच यश पडले नाही. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, अशाच काही निवडक स्टार्स फदर आणि त्यांच्या मुलांविषयी...
ईशा देओल
वडील- धर्मेंद्र

धर्मेंद्र बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या सनी आणि बॉबी या दोन्ही मुलांनी (पहिली पत्नी प्रकाश कौरचे ) चांगले नाव कमावले. त्यांची मुलगी (दुसरी पत्नी हेमा मालिनीची) ईशा देओलला डेब्यू सिनेमा 'कोई मेरे दिल से पुछे'साठी फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतु त्यानंतर तिला तिच्या करिअरमध्ये कधीच घवघवीत यश मिळाले नाही. धर्मेंद्र आजसुध्दा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालतात, मात्र मुलगी ईशाचे करिअर जवळपास २५ सिनेमांतच संपुष्टात आले.
महाअक्षय (मिमोह) चक्रवर्ती
वडील- मिथुन

बॉलिवूडमध्ये 'डिस्को डान्सर' म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांची गिणती यशस्वी अभिनेत्यांमध्ये होते. डान्सच्या बाबतीत त्यांचे नाव मायकल जॅक्शन, मोहम्मद अलीनंतर तिस-या क्रमांकावर घेतले जाते. दुसरीकडे मुलगा मिमोह मात्र यशापासून कोसोदूर आहे. त्याने बॉलिवूडमध्ये 'जिम्मी' सिनेमातून एंट्री घेतली. मिमोहने त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केले, त्यामध्ये 'द मर्डर्र', 'हॉन्टेड- 3D', 'लूट', 'एनेमी' सारखे फ्लॉप सिनेमे सामील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर यशस्वी वडील आणि फ्लॉप मुलांविषयी...