आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Filmfare Awards: पाहा दुर्मिळ फोटोज आणि जाणून घ्या या अवॉर्डविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच 61 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रंगणारेय. अलीकडेच यंदाच्या पुरस्कारांसाठी नामांकने जाहिर करण्यात आली. यंदा बदलापूर, बाजीराव मस्तानी, बजरंगी भाईजान, पिकू, तेवर, तनू वेड्स मनू या सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या श्रेणीत चुरस आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे हे 61 वे वर्ष आहे.
हिंदी सिनेसृष्टीसाठी मानाच्या समजल्या जाणा-या फिल्मफेअर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.
यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे निमित्त साधत आम्ही तुम्हाला हा पुरस्कार सोहळा कधी सुरु झाला आणि त्याविषयीच्या अनेक खास गोष्टी या रिपोर्टमधून सांगत आहोत. शिवाय फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचा नजराणादेखील आम्ही खास वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा
फिल्मफेअर हा भारताच्या सिनेसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. 1954 सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. 'द क्लेअर्स' हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले. 1956 सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या सोहळ्याविषयीच्या आणखी काही खास गोष्टी आणि सोबतच पाहा रेअर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...