आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यापासून ते सलमानपर्यंत, जेव्हा गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले हे 21 बॉलिवूड स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आगामी 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या शुटिंग सेटवर कंगना रनोटबरोबर गंभीर अपघात झाला असून त्यात तिच्या कपाळावर 15 टाके पडले आहेत. अपघातानंतर कंगनाला लगेचच हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या कंगना आयसीसीयूमध्ये अॅडमिट आहे. तिला सुमारे आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुटिंगदरम्यान तलवारीचा घाव लागल्याने कंगना जखमी झाली आहे. कंगनाच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेता-अभिनेत्रींसोबत शूटिंगच्या काळात गंभीर अपघात घडल्याची उदाहरणे बघायला मिळतात.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांविषयी सांगतोय, जे अपघातातून थोडक्यात बचावले... 
 
सलमान खान 
या यादीत बॉलिवूड सलमान खानसुध्दा सामील आहे. सलमान खानने स्वत: त्याच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या सांगण्यानुसार, तो 'तेरे नाम' (2003) सिनेमाचे शूटिंग करत होता. तेव्हा एका सीनसाठी ट्रेन समोर चालायचे होते. अचानक त्याला वाटले, की ट्रेन त्याच्या जवळ येतेय. तेव्हा त्याचा जीव वाचवण्यासाठी को-स्टारने त्याला धक्का देऊन रुळावरुन खाली ढकलले होते. तर 'वॉन्टेड' या सुपरहिट सिनेमाचे शूटिंग करतानासुद्धा सलमान जखमी झाला होता. सलमानला ही जखम एक अॅक्शन सीन शूट करताना झाली होती. या अपघाताने त्याच्या 'दबंग' सिनेमाचे शूटिंगसुध्दा थांबवण्यात आले होते. त्यानंतर 'जय हो'च्या शूटिंगवेळीसुध्दा त्याच्या हाताला दुखापत झाली होती.  

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्यासुध्दा 'खाकी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघाताला सामोरी गेली होती. नाशिकजवळ ऐश्वर्याच्या गाडीला एका अनकंट्रोल जीपने धडक दिली होती. या धडकेने ती दूर झाडाझुडपात जाऊन पडली होती. ती एका सीनचा सराव करत होती. त्यामध्ये एका वेगवान जीप घेऊन ऐश्वर्या 20 फुट दूर अंतरावर येऊन थांबायचे होते. परंतु चुकीने जीप ड्रायव्हरचे जीपवरून नियंत्रण सुटले आणि तो ब्रेक लावू शकला नाही. या अपघाताने तिचा फ्रॅक्चर झाले होते. 

पुढे वाचा, अशाच आणखी काही बॉलिवूड स्टार्सविषयी ज्यांना सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभींर दुखापत झाली... 
बातम्या आणखी आहेत...