आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Flop Actors Of Super Hit Film Dilwale Dulhania Le Jayenge

सुपरहिट 'DDLJ'मध्ये केले काम, मात्र फ्लॉप राहिले या 5 अॅक्टर्सचे करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 1995 मध्ये रिलीज झालेल्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाने शाहरुख खान आणि काजोलला स्टारपद बहाल केले. हा आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमाने काही लोकांचे करिअर यशोशिखरावर पोहोचवले, तर काही स्टार्सना मात्र या सिनेमाला मिळालेल्या यशाचा काहीच फायदा झाला नाही.
या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला या सिनेमातील अशा काही अॅक्टर्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी DDLJ या सुपरहिट सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली खरी, मात्र पुढे ते फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.
मंदिरा बेदी
अभिनेत्री म्हणून मंदिराचा हा पहिलाच सिनेमा होता. यापूर्वी ती 'शांती' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. 'डीडीएलजे'मध्ये ती शाहरुख खानसोबत झळखली होती. मात्र सिनेमाला मिळालेल्या यशानंतर मंदिराला एकही सिनेमा मिळाला नाही. 43 वर्षीय मंदिरा टीव्ही शो आणि होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर कार्यरत आहे. मात्र तिचे फिल्मी करिअर फ्लॉप राहिले.
मंदिरासोबतच 'डीडीएलजे'मधील आणखी काही असे स्टार्स आहेत, त्यांचे फिल्मी करिअर फार चालले नाही. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या हिट सिनेमातील फ्लॉप ठरलेल्या कलाकारांविषयी...