आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट डेब्यू नंतरही फ्लॉप ठरले या ९ अभिनेत्रींचे करिअर, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मायानगरी मुंबईला स्वप्ननगरी असेही म्हटले जाते. पण प्रत्येकाचेच स्पप्न पूर्ण होतेच असे नाही. अशाच काही अभिनेत्री आहेत ज्या आपले स्वप्न घेऊन या नगरीत आले, त्यांना पहिल्या प्रयत्नात यशही मिळाले पण ते टिकून ठेवण्यात त्या अयशस्वी ठरल्या. आज अशाच अभिनेत्रींची लिस्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ज्या त्यांच्या पहिल्या चित्रपटात गाजल्या, पण त्यानंतर सततच्या अपयशामुळे त्यांनी चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 
 
दीया मिर्झा 

दीयाने ३० एप्रिल २०१४ रोजी बॉलिवूड दिग्दर्शक साहिल सिंगासोबत लग्न करुन सेटल होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दीयाचे बॉलिवूड करिअर काही चांगले नव्हते. २००० साली मिस इंडिया-पॅसिफिक बनलेली दीया मिर्झाने २००२ साली केलेला चित्रपट रहना है तेरे दिल मै खूप गाजला. त्यातील गाणी आजही लोकांची आवडती गाणी आहेत. कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंग करणाऱ्या दीयाने त्यानंतर अनेक चित्रपट केले पण त्यातील एकही भूमिका अशी नव्हती जी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर दीयाने चित्रपट करणे बंद केले आणि ती सध्या तिच्या वैवाहिक जीवनात खूश आहे
 
तनुश्री दत्ता

२००४ साली फेमिना मिस इंडियाचे टायटल जिंकणाऱ्या तनुश्रीने २००५ मधील आशिक बनाया आपने चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इमरान हाश्मीसोबत असलेल्या या चित्रपटात तनुश्रीने अनेक बोल्ड सीन दिले. प्रेक्षकांनी तिच्या लुक्सचे कौतुकही केले. यानंतर तनुश्रीने 'चॉकलेट'(2005), 'रिस्क'(2007), 'गुड ब्वॉय-बैड ब्वॉय(2007)', 'रकीब'(2007), 'ढोल'(2007), 'स्पीड'(2007), 'सास, बहू आणि सेंसेक्स'(2008), 'रॉक'(2010) हे चित्रपट केले पण ते खास चालले नाहीत. सध्या तीने संन्यास घेतला असून ती आश्रमात राहत असल्याची माहिती मिळत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजून काही अभिनेत्री ज्यांचे करिअर चित्रपटसृष्टीत ठरले फ्लॉप..
बातम्या आणखी आहेत...