आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FLOP सिनेमांमधून डेब्यू करणा-या या 6 अॅक्ट्रेसेस आता आहेत साऊथच्या SUPER STAR

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात फ्लॉप सिनेमांमधून झाली. पण नंतर मात्र त्यांची गणना हिट अभिनेत्रींमध्ये झाली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रियामणी. 4 जून, 1984 रोजी बंगळूरूमध्ये जन्मलेली प्रियामणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची कजिन आहे. तिने 2003 साली 'एवरे अटगाडु' या साऊथ सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. तिचा हा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला होता. मात्र नंतर तिने अनेक हिट सिनेमे दिले. शाहरुखसोबत केलंय काम... 
 
1. प्रियामणी
प्रियमणीने शालेय दिवसांतच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. बारावीत शिकत असताना तामिळ दिग्दर्शक भारतीराजा यांनी फिल्म इंडस्ट्रीत तिला संधी दिली. प्रियामणीने शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमातील 'वन, टू, थ्री, फोर गेट ऑन द डांस फ्लोर' या गाण्यात त्याच्यासोबत ताल धरला होता. याशिवाय दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'रावण' या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम केले आहे. प्रियामणीने तामिळ आणि मल्याळम सिनेमातदेखील काम केले आहे. 2007 साली तिला तामिळ सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. तिने 'मधु' (2006), 'परुथिवीरण' (2007), 'थिरककथा' (2008), 'चारुलता' (2012), 'चंडी' (2013) सह अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

2. काजल अग्रवाल
काजल अग्रवालची गणना साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. पण काजललादेखील तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच अपयशाला सामोरे जावे लागले होते. 2007 साली आलेला 'लक्ष्मी कल्याणम' हा तिचा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. तर 2007 साली आलेल्या 'चन्दामामा' या तिच्या दुस-या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. काजलने 'मगधीरा' (2009), 'आर्या-2' (2009), 'वीरा' (2011), 'नायक' (2012), 'येवदु' (2014), 'सरदार गब्बर सिंह' (2015) सह अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...