आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FLOP KIDS : ही मुले टिकवू शकले नाहीत आईवडिलांचे स्टारडम, बसला फ्लॉपचा शिक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बरने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 मे 1981 मध्ये प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांच्या घरी आर्यचा जन्म झाला. आर्यने आपल्या करिअरची सुरुवात राज कंवर यांच्या 'अब के बरस' या सिनेमाद्वारे केली. या सिनेमात त्याच्यासोबत अमृता राव मेन लीडमध्ये होती. दुर्दैवाने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हिंदीसोबतच आर्यने बंगाली आणि पंजाबी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. आर्य आपल्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. 

मणिरत्नम, मधुर भंडारकर आणि विक्रम भट यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम करुनसुद्धा आर्यच्या करिअरची गाडी रुळावर येऊ शकली नाही. आर्यने आपल्या सिने करिअरमध्ये 'चमकू', 'जेल', 'तीस मार खां', 'जोकर', 'जिंदगी 50-50', 'डेंजरस इश्क' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. 

तसे पाहता आर्य बब्बर इंडस्ट्रीतील पहिला असा अभिनेते नाहीये, जो आपल्या वडिलांप्रमाणे प्रसिद्धी मिळवू शकला नाही. ईशा देओल, फरदीन खान, हरमन बावेजा, करण कपूर, उदय चोप्रा, संजय कपूर यांच्यासह बरेच असे कलाकार आहेत, जे आपल्या आईवडिलांच्या स्टारडमसोबत फिके पडतात.
 
ईशा देओल 
आई - हेमामालिनी
वडील - धर्मेंद्र

अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. मात्र तिला हवे ते यश मिळाले नाही. बोल्ड इमेज बनवण्यासाठी ईशाने 'धूम' या सिनेमात बिकिनी परिधान केली होती. तिचा 'टेल मी ओ खुदा' हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर तिने लग्न केले. ईशाने आपल्या करिअरमध्ये जवळपास 25 सिनेमांमध्ये अभिनय केला.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा 21  सेलिब्रिटींविषयी जे आपल्या आईवडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत...
बातम्या आणखी आहेत...