आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरदीन खान, ईशा देओलसह हे आहेत बॉलिवूडचे 13 FLOP स्टार किड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या काळात फिल्म इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले. त्यांची लोकप्रियता एवढी की केवळ त्यांच्या नावानेच सिनेमे चालत होते. यामध्ये हेमा मालिनी, मिथून चक्रवर्ती, फिरोज खान, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांसह अनेक स्टार्सच्या नावाचा समावेश आहे. मात्र या स्टार्सनी जेवढे यश मिळवले, तेवढे यश त्यांच्या मुलांच्या पदरी काही आले नाही.

मग फिरोज खान यांचा मुलगा फरदीन असो वा हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल.
बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेस आहेत, जी प्रसिद्ध कलाकारांची मुले असूनदेखील इंडस्ट्रीत फ्लॉप ठरली आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com वाचकांना इंडस्ट्रीत फ्लॉप ठरलेल्या अशाच काही स्टार किड्सविषयी सांगत आहे...
फरदीन खान
वडील- फिरोज खान

1998 मध्ये 'प्रेम अगन' या सिनेमाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा फरदीन प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक फिरोज खान यांचा मुलगा आहे. आपल्या 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने 'जंगल', 'प्यार तुने क्या किया', 'फिदा', 'देव' आणि 'ऑल द बेस्ट' या हिट सिनेमांमध्ये काम केले, मात्र त्याचे करिअर फार यशस्वी होऊ शकले नाही.
ईशा देओल
आई - हेमामालिनी
वडील - धर्मेंद्र

अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. मात्र तिला हवे ते यश मिळाले नाही. बोल्ड इमेज बनवण्यासाठी ईशाने 'धूम' या सिनेमात बिकिनी परिधान केली होती. तिचा 'टेल मी ओ खुदा' हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर तिने लग्न केले. ईशाने आपल्या करिअरमध्ये जवळपास 25 सिनेमांमध्ये अभिनय केला.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बॉलिवूडच्या FLOP स्टार किड्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...