आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत HIT अभिनेत्रींच्या FLOP बहिणी, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री रिंकी खन्नाने सोमवारी (27 जुलै) 38वा वाढदिवस साजरा केला. रिंकीचा जन्म 27 जुलै 1977 रोजी मुंबईमध्ये झाला. ती सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या यांची मुलगी आहे. तिने 1999मध्ये 'प्यार मे कभी कभी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'मुझे कुछ कहना है', 'जिस देस मे गंगा रहता है'सह 8 सिनेमांत काम केले. सिनेमांत यश न मिळाल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. 2003मध्ये तिने बिझनेसमन समीर सरनसोबत लग्न केले.
रिंकी बॉलिवूड अभिनेत्री टि्ंवकल खन्नाची धाकटी बहीण आहे. टि्ंवकलला जसे बॉलिवूडमध्ये यश मिळाले तसे यश रिंकीला नाही मिळू शकले. रिंकी आता सिनेमांपासून दूर संसारात बिझी आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सिनेसृष्टीत यशाचे झेंडे रोवले मात्र त्यांच्या बहिणींच्या पदरी अपयश पडले. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींना भेटवत आहोत, ज्यांच्या बहिणी सुपरफ्लॉप ठरल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सुपरहिट बहिणींच्या सुपरफ्लॉप बहिणींविषयी...