आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

90's मध्ये या बॉलिवूड अभिनेत्री होत्या यशोशिखरावर, अचानक निघून गेल्या अज्ञातवासात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री भाग्यश्री सलमान खानसोबत.)
एन्टरटेन्मेंट डेस्क : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी केवळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यच गाजवले नाही तर सोबतच नाव आणि पैसासुद्धा कमावला. मात्र आजच्या काळात या अभिनेत्री जणू बॉलिवूडमधून गायब झाल्या आहेत. यापैकी काही अभिनेत्रींचे अभिनय करिअर सुरुवातीच्या काळातच संपुष्टात आले तर काहींनी यशोशिखरावर पोहोचून सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
तुम्हाला मैनें प्यार किया या सिनेमातील अभिनेत्री भाग्यश्री आठवतच असेल ना. पहिल्याच सिनेमात सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळवणा-या भाग्यश्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. शिवाय हा सिनेमासुद्धा सुपरहिट ठरला होता. भाग्यश्रीने साकारलेली सुमन आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर भाग्यश्रीने हिमायल दासानी नावाच्या तरुणासोबत लग्न करुन संसार थाटला. लग्नानंतर तिचे तीन सिनेमे रिलीज झाले. ‘कैद में है बुलबुल’, ‘त्यागी’ आणि ‘पायल’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 1993 मध्ये अभिनेता अविनाशसोबत भाग्यश्रीचा मेरा परदेशी हा सिनेमा रिलीज झाला. 90 च्या दशकात रिलीज झालेला हा तिचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर 2001 मध्ये हॅलो गर्ल्स या सिनेमाद्वारे तिने कमबॅक केले. मात्र भाग्यश्रीचे कमबॅक फ्लॉप ठरले.
23 फेब्रुवारी 1969 मध्ये मुंबईत जन्मलेल्या भाग्यश्रीला अमोल पालेकर यांनी पहिल्यांदा अभिनयाची संधी दिली होती. कच्ची धूप या मालिकेत ती झळकली होती. सध्या भाग्यश्री पती हिमालय दासानी आणि दोन मुले अवंतिका आणि अभिमन्यू दासानीसोबत आपले कौटुंबिक जीवन व्यतित करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अज्ञातवासात निघून गेलेल्या 90 च्या दशकातील आणखी काही अभिनेत्रींविषयी...