आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 40व्या वर्षीसुध्दा अविवाहित आहे सुष्मिता, पाहा खासगी आयुष्यातील छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो-मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मिता सेन.)
बॉलिवूडची स्टाइलिश अभिनेत्री सुष्मिता सेन आज 40 वर्षांची झाली आहे. 1994मध्ये तिने मिस इंडियाचा किताब जिंकून आपल्या नावी केला होता. 20 मे रोजी केवळ वयाच्या 18व्या वर्षी मिस इंडिया यूनिव्हर्स बनलेली सुष्मितासाठी हा किताब एखाद्या स्वप्नाप्रमाणे होता. सुष्मितासाठी हा किताब आणखी एका कारणाने महत्वपूर्ण होता. तिने हे मिस इंडियाचे टायटल सौंदर्याची मल्लिका ऐश्वर्या रायचा पराभव करूनन जिंकले होते.
ऐश्वर्याला दिली कडक टक्कर
1994मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेविषयी सांगितले जाते, की त्यामध्ये जवळपास 26 तरुणींनी आपले नाव स्पर्धेतून मागे घेतले होते. कारण ऐश्वर्यासारखी सुंदर तरुणी समोर कुणाचेही टिकणे कठिण होते. नाव मागे घेणा-या तरुणींमध्ये सुष्मिताचेसुध्दा नाव होते. परंतु तिच्या आईने तिला समजावून सांगितल्यानंतर सुष्मिताने स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या सौंदर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने ही स्पर्धासुध्दा जिंकली.
एका उत्तराने सुष्मिताने मारली बाजी
सांगितले जाते, की ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यामध्ये मोठी टक्कर होती. परंतु मुलाखतीच्या फेरीत सुष्मिताने ऐश्वर्याला मागे टाकले. दोघींना विचारण्यात आले, की जर तुम्ही एखाद्या ऐतिहासिक घटनेला बदलू शकल्या असत्या तर ती कोणती असती? यावर ऐश्वर्याचे उत्तर होते, 'माझ्या जन्माची वेळी' आणि सुष्मिताचे उत्तर होते, 'इंदिरा गांधीचा मृत्यू'. असे मानले जाते, की याच उत्तराने दोघींच्या नशीबाचा निर्णय ठरला.
फॅमिली बॅकग्राउंड
सुष्मिताचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील सुबीर सेन इंडियन एअरफोर्स विंगमध्ये कमांडक होते. आई सुब्रा सेन ज्वेलरी डिझाइनर आहे. त्या दुबईमध्ये एक स्टोअर चालवतात. सुष्मिताला एक बहीण नीलम आणि भाऊ राजीव अशी भावंडे आहेत.
अद्याप अविवाहीत आहे
सुष्मिताने अद्याप लग्न केलेले नाहीये. तिने आपल्या लग्नाच्या प्रश्नावर सांगितले होते, की प्रत्येक चांगल्या कामाची एक विशेष्ट वेळ असते. त्यासाठी वाट पाहावी लागले. ती वेळ अद्याप आलेली नाहीये, परंतु एक ना एक दिवस तो दिवस नक्की येईल. मात्र अविवाहीत असूनदेखील ती दोन मुलींची आई आहे. सुष्मिताने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. अलीसा आणि आणि रैने असे या मुलींची नावे आहेत.
मुलींना घेतले दत्तक
सुष्मिता अद्याप सिंगलच आहे. परंतु तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. 2000मध्ये तिने पहिल्या मुलीला दत्तक घेतले होते, तिचे नाव सुष्मिताने रिनी ठेवले. रिनी आता 14 वर्षांची झाली आहे. जानेवारी 2010मध्ये तिने आणखी एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव अलीशा ठेवले. सुष्मिताने 3 महिन्याच्या अलीशाला दत्तक घेतले होते, ती आता 5 वर्षांची झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुष्मिता सेनचे कधीही न पाहिलेले PHOTOS...