आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From AbRam To Nitara Here Are The Top 10 Cute Star Kids

आराध्या, अबरामपासून ते नितारापर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे Cute Star Kids

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: (डावीकडून) ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, अबराम खान, शाहरुख खान (उजवीकडे) नितारा कुमार, ट्विंकल खन्ना - Divya Marathi
फाइल फोटो: (डावीकडून) ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, अबराम खान, शाहरुख खान (उजवीकडे) नितारा कुमार, ट्विंकल खन्ना
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या हिने नुकतीच वयाची चार वर्षे पूर्ण केली आहेत. 16 नोव्हेंबर 2011 रोजी जन्मलेली आराध्या आईवडिलांसोबतच आजोबा अमिताभ बच्चन यांची लाडकी आहे. बिग बी नेहमी आपल्या नातीची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असतात. आराध्या बी टाऊनच्या स्टायलिश स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्याप्रमाणेच शाहरुख खानचा मुलगा अबराम, अक्षय-ट्विंकलची मुलगी नितारा आपल्या आईवडिलांप्रमाणेच नेहमी लाइमलाटइमध्ये असतात.
एक नजर टाकुया, बी टाऊनच्या क्यूट स्टार कि़ड्सवर...
अबराम खान
27 मे 2013 रोजी सरोगसीच्या माध्यमातून शाहरुख खान आणि गौरी यांच्या घरी अबरामचा जन्म झाला. पॉप्युलॅरिटीमध्ये अबराम एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर दोन वर्षीय अबरामची छायाचित्रे व्हायरल होत असतात. एसआरकेसुद्धा नेहमीच आपल्या या चिमुकल्याची छायाचित्रे शेअर करत असतो.
नितारा कुमार
25 सप्टेंबर 2012 रोजी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या घरी जन्मलेली नितारादेखील पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. निताराचे आईवडीलसुद्धा तिची छायाचित्रे सोशल साइट्सवर शेअर करत असतात. मात्र या छायाचित्रांमध्ये ते नेहमी निताराची पाठमोरी झलक दाखवत असतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या आणखी काही प्रसिद्ध स्टार किड्सविषयी...