आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या काळात असा होता ऐश्वर्याचा लूक, बघा 25 बॉलिवूड स्टार्सचे असेच PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा येत्या 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सप्रमाणे ऐश्वर्यानेसुद्धा तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. फॅशन वर्ल्डमध्ये नाव कमावल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नववीत असताना मिळाली होती पहिली ऑफर...

बालपणी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न बाळगणा-या ऐश्वर्याचे मोठे होता होता मॉडेलिंगकडे लक्ष आकर्षित झाले होते. मॉडेलिंगची पहिली ऑफर तिला कॅमलिन कंपनीकडून मिळाली होती. त्यावेळी ती नववीत शिकत होती. त्यानंतर तिने कोक, फूजी आणि पेप्सी या जाहिरातींमध्ये काम केले आणि शिक्षणसुद्धा सुरु ठेवले होते. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असताना ऐश्वर्याने 1991 मध्ये सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली. फोर्डच्या वतीने आयोजित ही स्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायला व्होग मॅगझिनच्या अमेरिकन एडिशनमध्ये स्थान मिळाले होते. त्यानंतर 1993 मध्ये अभिनेता आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीत ऐश्वर्या झळकली आणि अॅडमधील प्रसिद्ध चेहरा बनली. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. तिने 1997 मध्ये इरुवर या सिनेमातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले होते.

आघाडीच्या स्टार्सची लेटेस्ट छायाचित्रे तुम्ही नेहमीच बघत असता, मात्र हेच स्टार्स मॉडेलिंगच्या दिवसांत कसे दिसायचे, हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...