आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From B Grade Actress To Comedy Queen, Sneek Peak Of Archana Puran Singh\'s Life

B\'Day: बी-ग्रेड सिनेमे ते लाफ्टर क्वीन, असा आहे अर्चना पूरन सिंहच्या आयुष्याचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अर्चना पूरन सिंह)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि अनेक कॉमेडी शोची परिक्षक प्रसिध्द अभिनेत्री अर्चना पूरन सिंह 53 वर्षांची झाली आहे. 26 सप्टेंबर 1962ला देहरादूनमध्ये जन्मलेली अर्चना पूरन सिंहला आज सर्वच ओळखतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आलाय होता, की तिने बी-ग्रेड सिनेमांतसुध्दा काम केले आहे. 90च्या दशकात तिने बी-ग्रेड सिनेमांत बोल्ड सीन्स दिले आहे.
लाफ्टर क्वीन नावाने झाली प्रसिध्द-
अर्चना वयाच्या 18व्या वर्षीच देहरादूनहून मुंबईला अनेक स्वप्ने उराशी बाळगून आली होती. परंतु तिला यशस्वी होण्यासाठी 8 वर्षे संघर्ष करावे लागले. मात्र आता ती टीव्हीवर कॉमेडी शोची परिक्षक म्हणून ओळखले जात आहे. तिने लाफ्टर क्वीन नावसुध्दा पडले आहे.
नसीरुद्दीन शाहसोबत मिळाले होते यश-
अर्चनाला 1987मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत 'जलवा' सिनेमातून यश मिळाले होते. हा सिनेमा हिट झाला होता. त्यानंतरसुध्दा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिला फोकस केले नाही. तिचा 'निकाह' (1982) हा डेब्यू सिनेमा आहे. त्यानंतर अर्चनाला सिनेमा मिळाले नाही, तिने नाइलाजाने बी-ग्रेड सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली. अनेक सिनेमांत तिने बोल्ड सीन्स दिले. मात्र त्यानंतर तिला, 'अग्निपथ', 'सौदागर', 'शोला और शबनम', 'राजा हिंदुस्तानी'सारखे सुपरहिट सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली. सिनेमांत अर्चनाने अनेक आयटम नंबरसुध्दा केले आहेत. तिने गोविंदाच्या 'बाज' आणि सुनील शेट्टीच्या 'जज मुजरिम'मध्ये आयटम साँग केले आहेत. अर्चनाने 'मोहब्बते', 'क्रिश', 'कुछ कुछ होता है', 'मस्ती', 'बोल बच्चन', 'डॉली की डोली'सारख्या सिनेमांतसुध्दा अभिनय केला आहे.
छोट्या पडद्यावर चालली जादू-
अर्चनाने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले आहे. परंतु मुख्य अभिनेत्री म्हणून एकही सिनेमा तिच्या पदरी आला नाही. तिने 1993मध्ये 'वाह, क्या सीन है'मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. हा कार्यक्रम खूप हिट झाला. त्यानंतर तिने 'जाने भी दो पारो', 'श्रीमान श्रीमती', 'अर्चना टॉकीज'मधून यश मिळवले. 2005मध्ये डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए'मध्ये अर्चना पती परमीत शेट्टीसोबत दिसली होती. 2006मध्ये तिने 'झलक दिखला जा' शो होस्ट केला. याचवर्षी ती सोनीवर प्रसारित होणा-या 'कॉमेडी सर्कस' शोची जज झाली. या शोसह तिला नवी ओळख मिळाली. शोमध्ये अर्चनाचा अंदाज विशेषत: हसण्याचा अंदाज लोकांना भावला. सध्या अर्चना लाइफ ओकेवर प्रसारित होत असलेल्या 'कॉमेडी क्लासेस' शोमध्ये परिक्षक म्हणून काम करतेय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्चना पूरन सिंहचे निवडक फोटो...