आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Hema Dharmendra To Srk Gauri, Here Is A List Of Celebs Who Married Against Parents Will

हेमापासून शाहरुख-आमिरपर्यंत, कुटुंबाच्या विरोधात जाऊन या सेलेब्सनी थाटला संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमा मालिनीसोबत धर्मेंद्र - Divya Marathi
हेमा मालिनीसोबत धर्मेंद्र
मुंबई: 30 एप्रिलला बिपाशा बसु बॉयफेंड सिंह ग्रोवरसोबत लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या, की करणच्या आईने बिपाशाला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच बातमी अशीही आली होती, की बिपाशाचे वडील हिरक बसु यांचीसुध्दा ईच्छा नव्हती, की त्यांच्या मुलीने एखाद्या घटस्फोटीत तरुणासोबत लग्न करावे. इतकेच नव्हे या नात्याविषयी बिपाशाचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता त्यांच्या या नात्याला परवानगी मिळाली आहे आणि दोघे 30 एप्रिलला लग्नगाठीत अडकणार आहेत.
प्रेमासाठी स्टार्सने सोडले घर...
बिपाशा-करणपूर्वी असे अनेक कपल आहेत, ज्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे. घर, कुटुंबीय, नातेवाईक इतकेच नव्हे तर धर्मांच्या सर्व भिंती तोडून स्टार्सने आपल्या प्रेमाला जोडीदार बनवले. याचेच एक मोठे उदाहरण आहे, धर्मेंद्र-हेमा मालिनी यांचे लग्न. विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौरसह त्यांची मुले या लग्नाच्या विरोधात होते. तरीदेखील धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत 1980मध्ये खंडाळ्याला पळून जाऊन लग्न केले. दोघांनी धर्म बदलून एकमेकांना साथ दिली.
बिपाशा-करण, हेमा-धर्मेंद्रसह अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी कुटुंब, धर्माचे बंधन तोडून लग्न केले. जाणून घेऊया अशाच सेलेब्सविषयी...