आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाश्मीची अॅक्ट्रेसच नव्हे हे फेमस कलाकार आले रस्त्यावर, अशा परिस्थितीत आढळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: इमरान हाश्मीसोबत काम केलेली अभिनेत्री अलीशा खानला अलीकडेच दिल्ली ग्रेटर कैलाशमध्ये रस्त्यांवर फिरताना पाहिल्या गेले. अलीशा सध्या बेघर असून रस्त्यावर धक्काबुक्कीचे आयुष्य जगत आहे. अशी परिस्थितीतून जाणारी अलीशा एकमेव अशी अभिनेत्री नाहीये. यापूर्वी अनेक स्टार्सनी अशा परिस्थितीचा सामना केला आहे. यांच्याकडे सर्वकाही होते, परंतु अचानक पैशा-प्रसिध्द गमावल्याने त्यांची अशी अवस्था झाली होती.
इतकेच नव्हे, काही सेलेब्स इतक्या वाईट परिस्थितीत आढळले, की त्यांना ओळखणेसुध्दा कठिण झाले होते. तसेच काहीजण एकांतामुळे मनोरुग्ण झाले, तर काही दु:खात मृत पावले. चला एक नजर टाकूया बॉलिवूडच्या अशाच काही सेलेब्सच्या आयुष्यावर ज्यांनी आयुष्यात खूप वाईट दिवस पाहिले.
राज किरण...
सर्वात मोठे प्रकरण 2010मध्ये अभिनेता राज किरण यांचे समोर आले होते. 'अर्थ' सिनेमात काम केलेले राज किरण मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या अटलांटिक स्थित एका मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
अशा वाईट परिस्थितीत त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांची साथ सोडली होती. राज किरण यांच्या मृत्यूच्यासुध्दा बातम्या आल्या होत्या. ही अफवा राज किरण यांच्या मित्राने उडवली होती. मात्र सुभाष घई यांच्या 'कर्ज' सिनेमात एकत्र काम केलेल्या ऋषी कपूर यांना यावर विश्वास बसला नाही. त्यांनी राज किरण यांना शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राज यांचा अमेरिकेच्या प्रवासादरम्यान शोध घेतला. सूत्रांच्या सांगण्यानुसार, राज किरण यांना त्यांच्या पत्नीने आणि मुलाने धोका दिला होता. त्यामुळे ते तणावात गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून वाईट परिस्थितीत आयुष्य घालवलेल्या सेलेब्सविषयी...