आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: असे झाले होते \'आशिकी 2\' चे ऑडिशन, टीव्ही स्टार्सही झाले होते सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्कः 'आशिकी 2' हा 2013 मधील म्युझिक हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमामुळे श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची करिअरची गाडी रुळावर आली. मात्र या सिनेमासाठी महेश भट यांची पहिली पसंती ही श्रद्धा आणि आदित्यला मुळीच नव्हती. त्याचे कारण म्हणजे या सिनेमासाठी महेश भट यांनी वर्ल्ड टॅलेंट हंटचे आयोजन केले होते. या टॅलेंट हंटमधील विजेत्याला सिनेमात घेण्याची योजना त्यांनी आखली होती. मात्र त्यांची ही योजना यशस्वी ठरली नाही.
महेश भट यांच्या मते, अनेक तरुण कलाकार टॅलेंट हंटच्या माध्यमातून ऑनलाइन ऑडिशन देण्यास घाबरले होते. व्हिडिओ बघून लोक आपल्याला रिजेक्ट करतील, अशी भीती त्यांना होता. त्यामुळे भट कॅम्पने नंतर मुंबईतच 'आशिकी 2'साठी ऑडिशन घेतल्या. यामध्ये स्ट्रगल करणारे कलाकार सहभागी झाले होते. मात्र त्यांच्यापैकी कुणाचीही निवड सिनेमासाठी होऊ शकली नव्हती. इतकेच नाही तर काही टीव्ही कलाकारांनीही 'आशिकी 2'साठी ऑडिशन दिले होते. यामध्ये 'डान्स इंडिया डान्स'चा होस्ट करण वाही, 'बिग बॉस'चा विजेता गौतम गुलाटी, अमित टंडन या कलाकारांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गौतम गुलाटी आणि अमित टंडनच्या ऑडिशन्सची छायाचित्रे...