आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

135 कोटींची कमाई करणा-या 'कभी खुशी कभी...' मध्ये झाल्या होत्या या Mistakes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने 21 सप्टेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. करीना कपूरच्या घरी झालेल्या बर्थडे बॅशमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या बर्थडे पार्टीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृताची मुलगी). व्हाइट क्रॉप टॉप, डेनिम्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये सारा दिसली. करीनाच्या बर्थडेचे निमित्ताने आम्ही तुम्हा सांगतोय करीना स्टारर 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात झालेल्या मिस्टेक्सविषयी..
करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाच्या रिलीजला 15 वर्षे झाली आहेत. 14 डिसेंबक 2001 रोजी रिलीज झालेल्या या मल्टी स्टारर सिनेमात करीना कपूर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, जया बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर राणी मुखर्जी कॅमिओ रोलमध्ये झळकली होती.

40 कोटी होते 'K3G'चे बजेट
'K3G' नावाने प्रसिद्ध झालेल्या सिनेमाचे बजेट 40 कोटी इतके होते. हा त्यावर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. तिकिटबारीवर सिनेमाने तब्बल 135 कोटींचा व्यवसाय केला होता. सिनेमातील गाणीसुद्धा बरीच गाजली होती. मात्र कधी कधी आपण फॅमिली ड्रामा बघण्यात इतके गुंग होतो की, त्यातील चुकांकडेही आपले लक्ष जात नाही. किंवा एखाद्या दृश्यात चुक झाली असली तरीदेखील आपल्या ती लक्षात येत नाही. काही असचे या सिनेमाच्या बाबतीत घडले आहे. या सिनेमात सहा चुका झाल्या आहेत, मात्र प्रेक्षकांच्या त्या लक्षातही आल्या नाहीत.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'कभी खुशी कभी गम' सिनेमातील त्या सहा चुका सांगतोय, ज्या जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल...
Mistake No. 1
सिनेमातील फ्लॅशबॅक पोर्शनमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नीसाठी 'आती क्या खंडाला...' हे गाणे गाताना दिसतात. सिनेमात 1991 चा काळ दाखवण्यात आला आहे. मात्र हे आती क्या खंडाला हे गाणे मुळात आमिर खान आणि राणी मुखर्जीच्या 1998 साली रिलीज झालेल्या 'गुलाम' सिनेमातील आहे. त्यामुळे ही विसंगतीच म्हणावी लागेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, 'K3G' मधील अशाच काही Funny Mistakes...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...