Home »Gossip» Funny Mistakes Of Aamir Khan Blockbuster Dangal

'दंगल' सुपरहिट, पण मिस्टर परफेक्शनिस्टच्या चित्रपटात एक दोन नव्हे झाल्या तब्बल 67 चुका

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 15:39 PM IST

मुंबई: 2016 मध्ये रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर 'दंगल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट आमिर खानच्या करिअरमधील आणखी एक सुपरडुपर हिट चित्रपट ठरला. चीनमध्येही या चित्रपटाने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. आमिर खानसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराणा यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटासाठी आमिर खान आणि त्याच्या टीमने कठोर मेहनत घेतली आहे. परफेक्शनिस्ट या नावाने प्रसिद्ध आमिरने महावीर सिंह फोगाट यांचे खासगी आयुष्य पडद्यावर आणण्यासाठी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली आहे. मात्र एवढे होऊनसुद्धा या चित्रपटातही अनेक उणीवा जाणवल्या आहेत.

होय, 'Bollywood Sins'नावाच्या एका युट्यूब चॅनलने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांप्रमाणेच दंगल या चित्रपटातील चुका शोधून काढल्या आहेत. युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओत चित्रपटात तब्बल 67 चुका झाल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ बनवणा-याने व्हिडिओच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले, की त्याला या चित्रपटातील चुकांवर व्हिडिओ करायचा नव्हता, पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. अतिशय गमतीशीर पद्धतीने या व्हिडिओत चित्रपटातील चुकांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

चला तर मग तुम्हीही बघा, परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चित्रपटात झालेल्या गमतीशीर चुका.. आणि हो या चुका दाखवणारा खास व्हिडिओ शेवटच्या स्लाईडवर बघायला विसरु नका...

Next Article

Recommended