आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खान झाला ५० वर्षांचा, शाहरुखच्या वाढदिवशी गौरी खानचे सरप्राइज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने सोमवारी ५० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त त्याची पत्नी गौरी व मुले आर्यन आणि सुहाना यांनी शाहरुखचा रविवारी मध्यरात्री केक कापून वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याला तिघांनी विशेष गिफ्टही दिले.

शाहरुखला दरवर्षी त्याचे चाहते घराबाहेर येऊन शुभेच्छांचा वर्षाव करतात. तसेच बॉलीवूडमधील दिग्गजही त्याला मनोभावे शुभेच्छा देतात. मात्र, कुटुंबीयांसोबत साजरा केलेला वाढदिवसाचा आनंद काही वेगळाच असल्याचे शाहरुखने सांगितले. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला आणि मनीष शर्मा दिग्दर्शित शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी यूट्यूबवरून प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘फॅन’ चित्रपटात शाहरुख हा स्वत:चाच चाहता दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात शाहरुख खान आर्यन खन्ना या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या फॅनच्या भूमिकेतही तोच गौरव म्हणून दिसणार आहे. गौरव आपला आवडता हीरो आर्यन खन्नाचा लहानपणापासूनच चाहता असतो. त्याचे छोट्या-मोठ्या आकाराचे फोटो जमा करण्यापासून ते त्याच्याविषयी कोणी वाईट बोलले तर मारामारी करण्यापर्यंत आणि त्याची स्टाइल मारण्यापर्यंत आर्यन खन्नाची भक्ती करत असतो. आर्यनला एकदा तरी भेटावे अशी गौरवची इच्छा असते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार "फॅन'
या चित्रपटात गौरवच्या भूमिकेत शाहरुख खानला २० वर्षांच्या तरुणाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये शाहरुखला पाहिल्यावर तो तरुण दिसतो. त्यामुळे फॅन चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. फॅन चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, लंडन, दिल्लीमध्ये झाले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १५ एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.