आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांची झाली शाहरुखची मुलगी, आई गौरीने बर्थडे विश करताना शेअर केला PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखची पत्नी गौरी खानने सुहानाचा हा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
शाहरुखची पत्नी गौरी खानने सुहानाचा हा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
मुंबईः शाहरुख खानची मुलगी सुहाना आता 17 वर्षांची झाली आहे. 22 मे 2000 रोजी मुंबईत सुहानाचा जन्म झाला. सुहानाची आई आणि शाहरुखची पत्नी गौरीने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर करुन लिहिले, Birthday Girl...Thank you. रविवारीसुद्धा गौरीने सुहानाचा एक फोटो शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. गौरीने लिहिले होते, "Celebrations for tomorrow #happy birthday.."

सुहानाला घाबरतो शाहरुख खान...
शाहरुख खानने अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये तो सुहानाला घाबरत असल्याचा उल्लेख केला आहे. सुहाना अतिशय समजूतदार असून चुकीचे काम करत असताना टोकत असल्याचे शाहरुखने मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सुहाना लहान असताना शाहरुख तिला सिनेमाच्या सेटवर सोबत घेऊन जात असे.  

सुहानाला व्हायचे आहे अभिनेत्री... 
गेल्यावर्षी एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते, की सुहानाची अभिनेत्री व्हायची इच्छा आहे. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुख आणि गौरीसोबतचे सुहानाचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...