आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta Basra And Harbhajan Sing To Get Married Again In Show Comedy Nights With Kapil

OMG... गीता बसरा करणारेय दुस-यांदा लग्न, पोहोचणार अनेक बॉलिवूड सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत अलीकडेच लग्नाच्या बंधनात अडकलेली अभिनेत्री गीता बसरा पुन्हा लग्न करणारेय. थांबा थांबा.... हे वाचून दुसरे तर्कवितर्क लावू नका... 28 ऑक्टोबर रोजी लग्नगाठीत अडकलेली गीता पुन्हा एकदा हरभजन सिंगसोबतच विवाहबद्ध होणारेय. लवकरच ही नवविवाहित जोडी कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमध्ये दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडी नाईट शोच्या सेटवर पुन्हा या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. तसेच मेंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सर्व विधी पुन्हा होणार असल्याचीही चर्चा आहे. हरभजन आणि गीताच्या या दुसऱ्या लग्नाला अनेक बॉलिवूड कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हरभजन सिंग आणि कपिल शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र आहेत. कपिल हरभजनच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. मात्र आता कपिल या शोद्वारे लग्नात सहभागी होणार आहे. कपिलचा शो म्हटल्यावर या लग्नसोहळ्यात विनोदाची खमंग फोडणी असणारच हे मात्र निश्चित.

आता कॉमेडी नाइट विथ कपिलच्या मंचावर भज्जी आणि गीताच्या लग्नाचे साक्षीदार होण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणारेय. हा शो कधी प्रसारित होणार याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
हा शो जेव्हा प्रसारित होईल तेव्हा त्याची झलक नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू, मात्र तोपर्यंत पाहा, हरभजन आणि गीताच्या ख-या लग्नाची ही खास छायाचित्रे...