आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Genelia And Riteish Deshmukh Celebrates Son Riaan's B'day On Sailor Themed

सेलर थीमवर साजरा झाला रितेश-जेनेलियाच्या क्यूट रिआनचा B'day, पाहा फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा लाडका मुलगा रिआन नुकताच एक वर्षाचा झाला. 25 नोव्हेंबर रोजी रिआनचा वाढदिवस होता. यानिमित्ताने रिआनच्या आईबाबांनी खास बर्थडे पार्टीच आयोजन केले होते.
रितेश आणि जेनेलियाने आपल्या चिमुकल्याचा पहिला वाढदिवस सेलर (खलाशी) थीमवर साजरा केला. ब्लू, व्हाइट आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये खास बर्थडे केक तयार करण्यात आला होता. याशिवाय कप केक्ससुद्धा पार्टीतील मुख्य आकर्षण होते. बुफे टेबलसुद्धा ब्लू, व्हाइट आणि रेड कलरने सजवण्यात आला होता.
विशेष म्हणजे बर्थडे बॉय रिआनचा ड्रेससुद्धा ब्लू आणि व्हाइट कॉम्बिनेशनमध्येच होता. या पार्टीची दोन छायाचित्रे जेनेलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, क्यूट रिआनच्या बर्थडे पार्टीची आणि सोबतच त्याची कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...