आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेलियाप्रमाणेच तिच्या भावाचेही झाले दोनदा लग्न, जाणून घ्या काय होते यामागचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिचा आज वाढदिवस आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची जेनेलिया पत्नी आहे. या दोघांच्या लग्नाला याचवर्षी चार वर्षे पूर्ण झालीत. 3 फेब्रुवारी 2012 रोजी वैदिक पद्धतीने रितेश-जेनेलिया विवाहबद्ध झाले होते. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या या क्यूट कपलने केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केले होते. या दोन्ही लग्नात कुटुंबीयांसह त्यांच्या फ्रेंड्सची उपस्थिती होती.

रंजक बाब म्हणजे जेनेलियाप्रमाणेच तिचा धाकटा भाऊ निगेलने जोडीदाराच्या रुपात हिंदू तरुणीची निवड केली. जेनेलियाने मराठी मुलगा रितेशसोबत तर तिचा धाकटा भाऊ निगेलने पंजाबी तरुणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. निगेलने गेल्यावर्षी 15 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाला. निगेलचे लग्न नवनीत कौरसोबत झाले आहे.
जेनेलियाप्रमाणेच निकेलसुद्धा दोन पद्धतीने लग्नगाठीत अडकला. निगेल ख्रिश्चन तर नवनीत पंजाबी असल्याने दोघांनी पंजाबी आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. या दोन्ही लग्नात निगेलची बहीण आणि भावोजी अर्थातच जेनेलिया-रितेश यांनी भरपूर धमाल-मस्ती केली होती. रितेश देशमुखचा मेव्हणा असलेला निगेल CNBC TV 18 मध्ये अँकर असून इक्विटी संशोधन विश्लेषक आहे.

निगेल-नवनीतच्या लग्नाची खास झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...