आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे हे काय!! जेनेलियाने 3 वर्षांपूर्वी दीराच्या लग्नात घातलेला लहेंगाच भावाच्या लग्नातही केला परिधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - धीरज देशमुखच्या लग्नातील जेनेलिया-रितेशचे छायाचित्र... उजवीकडे - जेनेलियाच्या भावाच्या लग्नातील त्यांचे छायाचित्र)

अभिनेत्री जेनेलिया देशमुख सध्या अतिशय आनंदी आहे. तिच्या या आनंदाचे कारण म्हणजे तिच्या माहेरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे आणि हा नवा पाहुणा आहे तिची वहिनी. जेनेलियाचा सख्खा भाऊ निगेल डिसुजा नुकताच लग्नगाठीत अडकला. CNBC TV 18 मध्ये अँकर आणि इक्विटी संशोधन विश्लेषक असलेला निगेल एका शाही सोहळ्यात बोहल्यावर चढला. आपल्या भावाच्या वरातीत जेनेलिया पती रितेशसोबत थिरकताना दिसली. यावेळी जेनेलिया रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन असलेल्या आकर्षक लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली. पण यावेळी जेनेलियाचा हा लूक यापूर्वीही बघितल्याचे आमच्या लक्षात आले.
त्याचे असे, की 3 वर्षांपूर्वी जेनेलियाने तिचा दीर आणि रितेश देशमुखचा धाकटा भाऊ धीरज देशमुखच्या लग्नात हाच लहेंगा परिधान केला होता. त्यावेळी जेनेलियाचे रितेशसोबत नुकतेच लग्न झाले होते. अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या अंतराने धीरजचे लग्न झाले होते. धीरजच्या वरातीत जेनेलिया याच लहेंग्यामध्ये रितेशसोबत ठुमके लावताना दिसली होती. त्यावेळी परिधान केलेला हा लहेंगा जेनेलियाने सख्ख्या भावाच्या लग्नात पुन्हा एकदा परिधान केलेला दिसला.
खरं तर बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी एकदा परिधान केलेला ड्रेस पुन्हा घालणे टाळत असतात. जेनेलिया मात्र त्याला अपवाद ठरलेली दिसतेय. भावाच्या लग्नात कपड्यांवर जेनेलियाने कदाचित आगाऊ खर्च न करण्याचे ठरवले असावे, म्हणूनच तीन वर्षांपूर्वी दीराच्या लग्नात घेतलेला सब्यसाची कलेक्शनमधील हा लहेंगा जेनेलियाने भावाच्या लग्नातही घातला.
पुढील स्लाईड्समध्ये आम्ही तुम्हाला धीरज देशमुखच्या लग्नात जेनेलियाची ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशनमधील लहेंग्यातील खास छायाचित्रे दाखवत आहोत...