आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घ काळापासून चित्रपटांपासून लांब आहे ही अभिनेत्री, लग्नानंतर करतेय जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 90's चित्रपटातील निळ्या डोळ्यांची अभिनेत्री मयूरी कांगो दीर्घ काळापासून चित्रपटांपासून लांब आहे. सर्वात शेवटी ती 2009 साली आलेल्या कुर्बान या चित्रपटात दिसली होती. यानंतर मयूरी कुठल्याही पार्टीत अथवा फंक्शनमध्ये दिसली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरीने आता चित्रपटसृष्टीला रामराम केला आहे आणि लग्नानंतर ती आता जॉब करत आहे. मयूरी सध्या गुरुग्राम येथील एका कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने घेतला लग्नाचा निर्णय..
 
- 1995 साली आलेल्या नसीम या चित्रपटातून मयूरीने डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'पापा कहते हैं', 'होगी प्यार की जीत' यांसारख्या चित्रपटात अभिनय केला पण हे चित्रपट खास चालले नाहीत. 

- यानंतर तिने 2000 साली टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिथे तिने नरगिस, थोड़ा गम थोड़ी खुशी, डॉलर बाबू, किट्टी पार्टी यांसारख्या मालिकात काम केले पण तिला तिथेही यश मिळाले नाही.

- चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही ठिकाणी यश मिळत नसल्याचे पाहून मयूरीने 2003 साली आदित्य ढिल्लनसोबत औरंगाबाद येथे लग्न केले. मयूरी आणि आदित्यची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे एका पार्टीत झाली होती. 
 
 लग्नानंतर अमेरिकेतून केले एमबीए..
 लग्नानंतर मयूरी पतीसोबत अमेरिकाला शिफेट झाली आणि तिने तिथे मार्केटींग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. नंतर 2004 ते 2012 सालपर्यंत तिने तिथेच नोकरी केली. 
 2011 साली मयूरीने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव आयन आहे.
 2013 साल मयूरी भारतात परत आली. कारण मुलाला आजीआजोबांचा सहवास लाभावा असे मयूरीला वाटत होते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, केवळ 10वी त असताना तिला मिळाला होता पहिला ब्रेक..
बातम्या आणखी आहेत...