आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरकन्येने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, बनली 'मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सौदर्य स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणी चांगले यश मिळवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. मूळची लातूरची असलेली आणि पुण्यातील राहणारी ईशा अग्रवाल हिने रशियामध्ये झालेल्या 'मिस ग्लोबल इंटरनॅशनल प्रिन्सेस' हा किताब मिळवला आहे. ईशाचे उद्या पुण्यात आगमन होणार असल्याची माहितीही मिळाली आहे. 

यापूर्वीही मिळवले अनेक किताब.. 
ईशाने यापूर्वीही काही सौंदर्यस्पर्धांमध्ये यश मिळवलेले आहे. 2015 मध्ये तिने 'Miss India Exquisite 2015', 'Miss Photogenic Queen 2015' हे किताब पटकावले होते. त्यानंतर तिने बाल्टीमोर 'Miss International Exquisite 2015' स्पर्धेतही पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. याच स्पर्धेत तिने 'Miss Photogenic International Queen 2015' हा किताब मिळवला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, ईशा अग्रवाल हिचे काही फोटो...
(फोटो ईशाच्या फेसबूक अकाऊंटवरून साभार)
 
बातम्या आणखी आहेत...