आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी एवढी Glamours अॅक्ट्रेस होती अर्चना, सनी देओलबरोबर दिला होता Kiss सीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्चना पूरण सिंग. इन्सेट - सनी देओलबरोबर 'आग का गोला' चित्रपटात. - Divya Marathi
अर्चना पूरण सिंग. इन्सेट - सनी देओलबरोबर 'आग का गोला' चित्रपटात.
मुंबई - अर्चना पूरण सिंग 54 वर्षांची झाली आहे. 26 सप्टेंबर 1962 ला देहराडूनच्या उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या अर्चनाला टिवही प्रेझेंटर आणि कॉमेडीसाठी ओळखले जाते. टिव्हीवर 'कॉमेडी सर्कस' सारख्या शोमध्ये जज तर 'कुछ कुछ होता है' आणि 'बोल बच्चन' सारख्या चित्रपटांतून कॉमेडी करून तिने लोकांना हसवले आहे. पण अर्चनाच्या करिअरची सुरुवात एका अॅडने झाली होती.

एका अॅडने झाली पॉप्युलर..
मुंबईत अर्चनाने सुरुवातीच्या काळात अनेक अॅड केल्या. पण तिला जलाल आगाच्या 'बँड अॅड' मधून यश मिळाले. याठिकाणी तिची प्रतिभा लक्षात आली. टिव्ही शो 'मिस्टर अँड मिसेस' मध्ये तिला रोल मिळाला. पंकज पुष्करच्या 'करमचंद' शोमध्येही अर्चनाला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर अनेक शोमध्ये ती अॅक्ट्रेस आणि प्रेझेंटर म्हणून समोर आली. अनेक शोमध्ये ती जजही बनली.

'जलवा'मधून मिळाली बॉलीवूडमध्ये ओळख..
1987 मध्ये अर्चनाने आदित्य पांचोलीबरोबर टिव्ही मुव्ही 'अभिषेक' मध्ये लीड रोल केला होता. त्यानंतर ती नसिरुद्दीन शाहबरोबर 'जलवा' मध्ये झळकली. हा सुपरहिट चित्रपट ठरला. त्यामुळे एका रात्रीत अर्चना स्टार बनली. पण लीड अॅक्ट्रेस म्हणून तिला मोठी कामगिरी करता आली नाही. तिने 'अग्निपथ', 'सौदागर', 'शोला और शबनम', 'आशिक आवारा' आणि 'राजा हिन्दुस्तानी' अशा अनेक चित्रपटात छोट्या भूमिका केल्या. 'बाज' तसेच 'जज मुजरिम' सारख्या चित्रपटांत आयटमनंबर केले. 'आग का गोला' मध्ये सनी देओलबरोबर हॉट Kissing सीन देण्याबरोबरच 'रात के गुनाह' सारखे बी-ग्रेड चित्रपटही तिने केले.
अर्चनाची लव्ह स्टोरी..
टिव्हीवरील प्रसिद्ध कपल अर्चना पूरण सिंग आणि परमित सेठी यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. पहिला विवाह मोडल्यानंतर अर्चनाने पुन्हा लग्नाचा विचार सोडला होता. पण परमित सेठीबरोबर भेट झाल्यानंतर तिला त्याच्यात एक चांगला प्रेम करणारा व्यक्ती आढळला. दोघे त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते.
हळू हळू दोघांची मैत्री पुढे सरकली आणि तिचे प्रेमात रुपांतर झाले. ते दोघे एकमेकांना डेट करत होते तेव्हा परमित रोज अर्चनासाठी तीन गुलाबाची फुले आणायचा. लग्नाआधी दोघे चार वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. कुटुंबीय त्यांच्या नात्यासाठी राजी नव्हते. इंडस्ट्रीमध्येही गॉसिपिंग सुरू असायचे. अखेर कशाचीही पर्वा न करता दोघांनी 30 जून 1992 ला लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्चना पूरण सिंगचे काही Photos
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...