आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glamorous Bollywood Hollywood Celebs Who Are 35 Plus Age

बिपाशा, करीनासह या अभिनेत्री आहेत 35 प्लस, मात्र दिसतात Glamorous

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री बिपाशा बसूने नुकतीच वयाची 37 वर्षे (7 जानेवारी 1979) पूर्ण केली आहेत. तिचे लूक्स आणि ग्लॅमर बघता तिच्या वयाविषयी कळत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरदेखील आपली जादू कायम ठेवली आहे. या अभिनेत्रींना बघता त्या पस्तीशीतील नव्हे तर चक्क पंचवीशीतील तरुणींसारख्या दिसतात.
एक काळ असा होता, जेव्हा सोनाली बेंद्र, रवीना टंडन या अभिनेत्रींच्या करिअरला वयाची तिशी ओलांडताच ब्रेक लागला होता. मात्र आता ट्रेंड बदलला आहे. एकीकडे खान त्रिकुट आजही बॉलिवूडवर वर्चस्व गाजवत आहेत, तर दुसरीकडे विद्या बालन, करीना कपूरसह अनेक अभिनेत्री वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे विद्या आणि करीना यांच्या करिअरला लग्नानंतरसुद्धा ब्रेक लागलेला नाहीये. ऐश्वर्या राय बच्चन आई झाल्यानंतर इंडस्ट्रीत ग्रॅण्ड पुनरागमन केले. खरं तर वयाची तिशी ओलांडल्यानंतरच अभिनेत्रींच्या करिअरचा ढासळता आलेख सुरु होतो, असे म्हटले जाते. शिवाय काही जणी लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम ठोकतात. मात्र आता बॉलिवूडमधील या वयाच्या अभिनेत्री सर्वाधिक यशस्वी आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच अभिनेत्रींविषयी...