आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PHOTOSच्या माध्यमातून सोशल मीडियावर असतो श्रीदेवीच्या ग्लॅमरस मुलींचा दबदबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुशी आणि जान्हवी कपूर - Divya Marathi
खुशी आणि जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही लेकींची अर्थातच जान्हवी आणि खुशी कपूर यांची अद्याप ग्लॅमर इंडस्ट्रीत एन्ट्री झालेली नाही. मात्र दोघींचा ग्लॅमरस अंदाज बघता, त्या इंडस्ट्रीत अॅक्टिव नाही, याचा अंदाज बांधणे कठीण होते. दोघीही आपल्या आईवडिलांसोबत जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये अवतरतात, तेव्हा आपसूकच उपस्थितांच्या नजरा त्यांच्याकडे ग्लॅमरस अंदाजाकडे वळतात.
एकीकडे जान्हवी कपूर सुपरस्टार ममटीचा मुलगा दिलकर सलमानसोबत डेब्यूची तयारी करत आहे, तर दुसरीकडे खुशी कपूर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच खुशीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक छायाचित्र शेअर केले, यामध्ये ती पॉप सिंगर जॅक गलनस्काईच्या गालावर किस करताना दिसत आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
तसे पाहता, दोघीही बहिणी सोशल मीडियावर अॅक्टिव आहेत. दोघींची अनेक नवीन छायाचित्रे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळतात. ही छायाचित्रे बघता दोघीही बॉलिवूडमध्ये धमाल करतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कपूर बहिणीचा हा खास अंदाज...
बातम्या आणखी आहेत...