आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अॅक्ट्रेस मुमताज आणि गुजराती बिझनेसमनची ग्लॅमरस लेक, जाणून घ्या हिच्याविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : 31 जुलै रोजी बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली. मुमताज आता पती मयूर माधवानीसोबत लंडनला स्थायिक झाल्या आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी मुमताज यांनी बिझनेसमन मयूर माधवानींसोबत लग्न करुन सिनेसृष्टीला रामराम ठोकला. लग्नानंतर त्या युगान्डाला निघून गेल्या. त्यांना नताशा आणि तान्या या दोन मुली आहेत.
थोरली मुलगी नताशाचे लग्न बॉलिवूड अभिनेता फरदीन खानसोबत झाले आहे. तर त्यांची धाकटी लेक तान्यासुद्धा गेल्यावर्षी विवाहबद्ध झाली. नताशापेक्षा तान्या सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव असते. सोशल मीडियावर ती आपली छायाचित्रे कायम पोस्ट करत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची अनेक ग्लॅमरस अंदाजातील छायाचित्रे बघायला मिळतात. तान्याचे लग्न ब्रिटिश वंशाच्या मार्कोसोबत झाले आहे. तान्या आणि मार्कोचे लग्न इंग्लडमधील पद्धतीनुसार झाले होते. मार्कोसोबत लग्नापूर्वी तान्याचे नाव बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रासोबत जुळले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मुमताज यांच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...