आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाइफमध्ये एवढी Glamours आहे ही सिंगर, कॅट-सनीसाठी गायली आहेत गाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'बार बार देखो' चित्रपटातील काला चश्मा.. हे गाणे सध्या चाहत्यांमध्ये भलतेच प्रसिद्ध झाले आहे. यू ट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 71 मिलियन हिट्स मिळाले आहेत. रॅपर बादशहा आणि गायिका नेहा कक्कड यांनी एकत्रितपणे हे गाणे गायले आहे. 'इंडियन शकिरा' आणि 'सेल्फी क्वीन' नावाने प्रसिद्ध झालेली नेहा कक्कड सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध आहे.
भाऊ बहीणही आहेत गायक..
6 जून 1988 ला जन्मलेली नेहा कक्कड हिचा जन्म ऋषिकेशमध्ये झाला होता. दिल्लीत लहानाची मोठी झालेली नेहा हिचा भाऊ टोनी आणि बहिणी सोनू हे दोघेदेखिल गायक आहेत. नेहा 11 व्या वर्गात शिकत होती, त्यावेळीच ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती.

यांना डेट करतेय नेहा..
नेहा रेस्तरॉ Kinbuck2 चे मालक अंशुल गर्ग यांची बेस्ट फ्रेंड आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यांचे नाते मैत्रीपेक्षाही फार पुढचे असल्याचे आपल्या लक्षात येईल. अंशुल नेहाच्या कुटुंबाच्याही खूप क्लोज आहे. नेहाच्या कुटुंबीयांबरोबर ते अनेकदा व्हॅकेशनला जात असतात.

या गाण्यांनी झाली प्रसिद्ध..
2009 मध्ये आलेल्या 'जेल' चित्रपटातील 'बरेली के बाजार मे रिमिक्स' द्वारे नेहाने बॉलीवूडमध्ये गायन करण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर सेकंड हँड जवानी.. (कॉकटेल), सनी सनी.. (यारियां), लंडन ठुमकदा.. (क्वीन), मनाली ट्रान्स.. (द शौकीन्स), आओ राजा.. (गब्बर इज बॅक), सोच न सके.. (एअरलिफ्ट), कर गई चुल.. (कपूर अँड सन्स), सनी लियोनीबरोबर दो पेग मार... असे अनेक पॉप्युलर गाणे तिने गायले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबरचे नेहाचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...