आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाइफमध्ये एवढी Glamours आहे ही सिंगर, कॅट-सनीसाठी गायली आहेत गाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही वरील अंगुरी भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शिंदे हिच्या 'लाइन मारो' या गाण्यामुळे सध्या तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे गाणे ऐश्वर्या निगम आणि नेहा कक्कड यांनी गायले आहे. ज्याप्रमाणे गाण्यात शिल्पाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे, त्याचप्रमाणे या गाण्याची गायिकाही रियल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे. 'इंडियन शकिरा' आणि 'सेल्फी क्वीन' नावाने प्रसिद्ध झालेली नेहा कक्कड सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध आहे.

भाऊ बहीणही आहेत गायक
6 जून 1988 ला जन्मलेली नेहा कक्कड हिचा जन्म ऋषिकेशमध्ये झाला होता. दिल्लीत लहानाची मोठी झालेली नेहा हिचा भाऊ टोनी आणि बहिणी सोनू हे दोघेदेखिल गायक आहेत. नेहा 11 व्या वर्गात शिकत होती, त्यावेळीच ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती.

या गाण्यांनी झाली प्रसिद्ध..
2009 मध्ये आलेल्या 'जेल' चित्रपटातील 'बरेली के बाजार मे रिमिक्स' द्वारे नेहाने बॉलीवूडमध्ये गायन करण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर सेकंड हँड जवानी.. (कॉकटेल), सनी सनी.. (यारियां), लंडन ठुमकदा.. (क्वीन), मनाली ट्रान्स.. (द शौकीन्स), आओ राजा.. (गब्बर इज बॅक), सोच न सके.. (एअरलिफ्ट), कर गई चुल.. (कपूर अँड सन्स), सनी लियोनीबरोबर दो पेग मार... असे अनेक पॉप्युलर गाणे तिने गायले आहेत.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबरचे नेहाचे काही PHOTOS..
 
 
बातम्या आणखी आहेत...