आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glamours Photos Of Shahrukh Khans Daughter Suhana

चक्क आपल्या लाडक्या लेकीला घाबरतो शाहरुख, पाहा सुहाना खानचे ग्लॅमरस PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडच्या बादशाहसाठी आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे. 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. रात्री 12 वाजता आपल्या मुलांसोबत केक कापून शाहरुखने खास दिवसाला सुरुवात केली. शाहरुख आपल्या बिझी शेड्युलमधूनसुद्धा आपल्या मुलांकडे संपूर्ण लक्ष देत असतो. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. आर्यन, अबराम ही त्याच्या मुलांची तर सुहाना हे मुलीचे नाव आहे.
अबराम घरातील सर्वात लहान मेंबर आहे. त्यामुळे तो आई गौरी आणि शाहरुखसाठी सर्वात खास आहे. मात्र सुहाना एकुलती एक मुलगी असून तिचे स्थान शाहरुखच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आङे. 22 मे 2000 रोजी जन्मलेली सुहाना आता 15 वर्षांची झाली आहे. ती आपल्या फ्रेंड्ससोबत आउटिंगला असताना नेहमी ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असते.
डान्सिंग आणि स्पोर्ट्समध्ये आहे सुहानाची रुची
सुहानाला डान्सिंग आणि स्पोर्ट्स अतिशय आवडते. शाळेत ती अनेक स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये सहभागी होत असते. मात्र शाहरुखची इच्छा आहे, की सुहानाने एक उत्तम डान्सर बनून नाव कमवावे. आपल्या एका मुलाखतीत त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती. सुहाना स्टेट लेव्हलच्या तायक्वांडो चॅम्पिअनशिपमध्ये सहभागीदेखील झाली आहे. याशिवाय शाळेत फुटबॉल टीममध्येसुद्धा ती आहे.
शाहरुख-गौरीची लाडकी आहे सुहाना
शाहरुखने अनेकदा आपल्या मुलीवर असलेले प्रेम व्यक्त केले आहे. एका इव्हेंटमध्ये त्याने सांगितले होते, की घरात तो केवळ सुहानालाच घाबरतो. सुहाना अतिशय समजूतदार असून अनेकदा त्याच्या चुका त्याच्या निदर्शनास आणून देत असते. सुहाना लहान असताना शाहरुख तिला आपल्या सिनेमांच्या सेटवर घेऊन जात असते. वडिलांप्रमाणेच सुहाना आपल्या आईचीही लाडकी आहे. अनेकदा आई-मुलीची ही जोडी एकत्र दिसत असते.
सोशल मीडियावर आहे अॅक्टिव
सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव असून नित्यनेमाने आपली छायाचित्रे शेअर करत असते. सुहानाची अनेक ग्लॅमरस अंदाजातील छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुखच्या लाडक्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज...