आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glimpse Of Abhishek Bachchan’S Bungalow Jalsa,Janak And Prateeksha

'जलसा'मध्ये वास्तव्याला आहे ऐश्वर्या-अभिषेक, पाहा 'जनक'-'नैवेद्य'सह 'प्रतिक्षा'चे खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रेः डावीकडून वर - 'जलसा' बंगला, खाली- 'जनक'मधील आतील दृश्य, उजवीकडे - अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन - Divya Marathi
छायाचित्रेः डावीकडून वर - 'जलसा' बंगला, खाली- 'जनक'मधील आतील दृश्य, उजवीकडे - अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आज आपल्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा करत आहेत. 20 एप्रिल 2007 रोजी हे दोघे लग्नाच्या गाठीत अडकले होते. अभिनय क्षेत्रात कार्यरत असेलल्या बच्चन कुटुंबीयांकडे अमाप संपत्ती आहे. म्हणूनच बॉलिवूडमध्ये बिग बी कदाचित एकमेव अभिनेते असतील, ज्यांच्याकडे मुंबईतच एक दोन नव्हे तर तब्बल पाच बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत जवळजवळ 300 कोटींच्या घरात आहे.
प्रतीक्षा, जलसा, जनक आणि नैवेद्य या बंगल्यांसह आणखी एका बंगल्याचे बच्चन कुटुंबीय मालक आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह 'जलसा'मध्ये वास्तव्याला आहे. तर 'जनक'मध्ये त्यांचे ऑफिस आहे.
'प्रतिक्षा' आहे बिग बींचा पहिला बंगला...
बिग बींकडे मुंबईतील जुहू परिसरात आलिशान बंगले आहेत. 'जलसा'मध्ये त्यांचे कुटुंबीय सध्या वास्तव्याला आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक अधूनमधून प्रतीक्षामध्ये राहायला जात असतात. तर 'जनक' बंगल्यात बिग बींचे ऑफिस आहे. येथे ते मीडिया आणि पाहुण्यांना भेटतात. 70च्या दशकात बिग बी 'प्रतीक्षा' या बंगल्यात राहायला आले होते. हा त्यांचा पहिला बंगला आहे. त्यानंतर त्यांनी 'जलसा' बंगला खरेदी केला. 'जनक'च्या प्रवेशद्वाराजवळ बिग बींचे मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहे. शिवाय तेथे एक मंदिरसुद्धा आहे.
आज आम्ही तुम्हाला बच्चन कुटुंबीयांच्या मालकीच्या असेलल्या बंगल्यांची खास झलक दाखवत आहोत....