आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टर कट म्हणाले तरी सिद्धार्थ-जॅकलिनचे किस सुरुच, 'बंदू कमेरी लैला' गाणे लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी अ जेंटलमन चित्रपटातील बंदूक मेरी लैला हे गाणे नुकतेच लाँच करण्यात आले. या गाण्याच्या लाँचच्या वेळी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिनसह चित्रपटाचे डायरेक्टर कृष्णा आणि राज यांचीही उपस्थिती होती. जॅकलिन आणि सिद्धार्थ यांची चांगलीच केमिस्ट्री यावेळी पाहायला मिळाली. चित्रपटाच्या डायरेक्टरने यावेळी जॅकलिन आणि सिद्धार्थ यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केले. 

कट म्हणालो तरी किसींग सुरूच..
एका पत्रकाराने चित्रपटातील किसींग सीनबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याविषयावर बोलताना डायरेक्टर कृष्णा आणि राजू यांनी काही गमतीजमती सांगितल्या. एक किस सीन शूट करताना मी थांबा थांबा म्हणत होतो, तरी सिद्धार्थ आणि जॅकलिन यांचे किसींग सुरुच होते. या चित्रपटात आतापर्यंतचा सर्वाधिक लांब किसींग सीन असल्याचे म्हटले जात आहे. 

जॅकलिन म्हणाली.. सारखे डिस्टर्ब करत होते...
डायरेक्टरनी किसींग सीनबाबत सांगितले तेव्हा जॅकलिन म्हणाली की, त्यांना चांगला किसींग सीन हवा होता पण ते सारखे कट कट म्हणत होते, अशाने सीन कसा होणार. शिवाय त्यांना वेगवेगळे अँगल हवे होते, म्हणून आम्ही सीन करत होतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, साँग लाँच कार्यक्रमाचे काही फोटो, अखेरच्या स्लाइडवर पाहा बंदूक मेरी लैला गाण्याचा व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...