आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : मोठ्या पडद्यापासून दुरावली ग्रेसी, फ्लॉप सिनेमांमुळे रुळावरुन घसरली करिअरचा गाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः ग्रेसी सिंह, पहिल्या छायाचित्रात 'लगान'च्या सीनमध्ये आमिर खानसोबत. - Divya Marathi
फाइल फोटोः ग्रेसी सिंह, पहिल्या छायाचित्रात 'लगान'च्या सीनमध्ये आमिर खानसोबत.
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंहने आज वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. 20 जुलै 1980 रोजी नवी दिल्लीत तिचा जन्म झाला. आशुतोष गोवारिकरांच्या 'लगान' या सिनेमासाठी ग्रेसीला ओळखले जाते. गौरी नावाचे पात्र तिने या सिनेमात साकारले होते.
ग्रेसीने आपल्या करिअरची सुरुवात 1997मध्ये छोट्या पडद्यावरील 'अमानत' या मालिकेद्वारे केली होती. ग्रेसीचे वडील स्वर्णसिंग वरजिंदसिंग यांची इच्छा होती, की ग्रेसीने इंजिनिअर व्हावे. तिने अभ्यास केला मात्र तिला नशीबाने मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आणले. 'अमानत' मालिकेत काम केले. यादरम्यान ग्रेसीने 'लगान'साठी स्क्रिन टेस्ट दिली आणि तिची सिनेमासाठी निवड झाली. या सिनेमासह तिच्यासाठी बॉलिवूडचे मार्ग खुले झाले.
तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम केले आणि 'लगान' हिट ठरला. या सिनेमात ग्रेसीने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. या सिनेमामुळे तिच्या पदरी अनेक सिनेमांच्या ऑफर पडल्या. 2003मध्ये अजय देवगणसह 'गंगाजल' आणि 2004मध्ये संजय दत्तसह 'मुन्नाभाई MBBS'मध्ये तिने काम केले. हे दोन्ही सिनेमे हिट ठरले.
ग्रेसी यशाच्या मार्गावर दिर्घकाळ चालू शकली नाही आणि बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक तिचे सिनेमे फ्लॉप व्हायला लागले. फ्लॉप सिनेमांमुळे ती तेलगू, पंजाबी, गुजराती, मल्याळम, कन्नडी, मराठीसारख्या अनेक भाषांमध्ये काम करायला लागली. परंतु तिच्या वाट्याला यश आले नाही. 'लगान'साठी IIFA पुरस्कारापासून ते इतर पुरस्कार जिंकणा-या ग्रेसीने आता स्वत:ची अभिनेत्री म्हणून ओळख गमावली आहे. अभिनयासह ती शास्त्रीय नृत्य शिकली आहे. सध्या मोठ्या पडद्यापासून दुरावलेली ग्रेसी सामाजिक कार्यात रमत आहे. 'सेव्ह अवर सोल्स' या एनजीओसाठी ग्रेसी काम करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रेसी सिंहची निवडक छायाचित्रे...