आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar, Karan Johar, Anil Ambani And Many More Celebs Attended Abhishekh Wedding

PICS मध्ये पाहा अभिषेक-ऐश्वर्याच्या शाही लग्नसोहळ्यात कोण-कोण होते खास पाहुणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात सहभागी झालेले सेलिब्रिटी... - Divya Marathi
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात सहभागी झालेले सेलिब्रिटी...
मुंबईः बॉलिवूड स्टार्सचे लग्न नेहमीच खास असते. याच लग्नाच्या यादीतील एक खास लग्न म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनचे. महानायक अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक जेव्हा ऐश्वर्याला आपली जीवनसंगिनी बनवण्यासाठी वरात घेऊन निघाला तेव्हा संपूर्ण मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न 2007मधील बी टाऊनमधील सर्वात मोठा सोहळा होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडसोबतच, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्स सहभागी झाले होते.
कसे पडले अभिषेक-ऐश्वर्या प्रेमात...
खरं तर बॉलिवूडच्या या स्टार जोडीचे अर्थातच अभिषेक आणि ऐश्वर्याचे कधी लग्न होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. सस्पेन्स, रोमान्स, ड्रामा... अभिषेक-ऐश्वर्याच्या लव्ह स्टोरीत सर्वकाही होते. कुछ ना कहो, सरकार राज, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के या सिनेमांमध्ये हे दोघे एकत्र झळकले. खासगी युष्यात या दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय सिनेमांनाच जातं. अनेक जण सांगतात की, 'बंटी और बबली' सिनेमातील 'कजरारे कजरारे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सुत जुळले. नंतर 'गुरु' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी आपल्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब केले. टोरंटोमध्ये 'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअरवेळी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रीमिअरहून मुंबईला परतल्यानतंर अमिताभ बच्चन यांच्या राहत्या घरी 14 जानेवारी रोजी या दोघांचा साखरपूडा झाला होता. या दोघांच्या हायप्रोफाईल रिलेशनशिपवर सगळ्यांच्या नजरा खिळून होत्या. बच्चन फॅमिलीने अभि-ऐशचा लग्नसोहळा हा खासगी सोहळा ठेवला होता. 20 एप्रिल 2007 रोजी हे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.
लग्नात बॉलिवूडसोबतच, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्सची हजेरी
अमर सिंह, अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते यश चोप्रा, टूनटून, काजोल, सोनाली बेंद्रे, रितेश देशमुख, अनुपम खेर, किरण खेर, रामगोपाल वर्मा, करण जोहर, अजय देवगण, संजय आणि मान्यता दत्तसह अनेक सेलिब्रिटींनी लग्नात उपस्थित राहून अभिषेक-ऐश्वर्या यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अनिल अंबानी अभिषेकच्या वरातीत थिरकताना दिसले होते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला आज नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांच्या आयुष्यात आराध्या नावाच्या गोंडस मुलीचे आगमनसुद्धा झाले आहे. मात्र या दोघांच्या लग्नाची छायाचित्रे बघण्यास आजही त्यांचे चाहते उत्सुक असतात. म्हणूनच आज अभिषेक-ऐश्वर्या यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नात कोण-कोण खास पाहुणे होते ते दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नऊ वर्षांपूर्वी अभिषेक-ऐश्वर्या यांच्या ग्रॅण्ड वेडिंगमध्ये पोहोचलेल्या पाहुण्यांची खास झलक...